फोटोसाठी वाटेल ते... ! या हुल्लडबाजीने जीव गेला तर जबाबदार कोण?

जीव धोक्यात टाकून फोटोसेशन

Updated: Dec 8, 2021, 11:35 AM IST
फोटोसाठी वाटेल ते... ! या हुल्लडबाजीने जीव गेला तर जबाबदार कोण?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

अनिरुद्ध दवाळे, अमरावती : पर्यटनाच्या नावावर गेलेल्या प्रत्येक ठिकाणी फोटो काढून आपण किती छान आणि रम्य ठिकाणी आलो आहोत हे इतरांना सांगण्यासाठी सतत स्टेटस अपडेट करणारा एक वर्ग असतो. तर, पर्यटनस्थळाचे फोटो आठवणीच्या स्वरुपात जपणारा दुसरा वर्ग. 

मुळात यामध्ये हा जो पहिला वर्ग आहे त्याची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. ज्याचं अपग्रेडेडल वर्जन, म्हणजेच काही हुल्लडबाज मंडळी चिखलदरा येथे पाहायला मिळाली. 

सेल्फी, फोटोच्या नादात अनेक तरुण तरूणीनी आतापर्यंत आपला जीव गमावल्याच्या घटना आपण एकलीये. पण, हे सारं घडूनसुद्धा तरुण तरूणी यातून काहीच धडा घेत नसल्याचं दुर्दैवी चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. 

जीवापेक्षा फोटो, सेल्फी महत्वाचा आहे का असा प्रश्न या मंडळींची कृती पाहताना लक्षात येत आहे. 

कारण, अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर नागपूर मधील तरुणांची हुल्लडबाजी समोर आली आहे. 

चिखलदरामधील हरिकेन पॉइंट वर जीव धोक्यात टाकून हजारो फूट खोल दरीच्या काठावरील दगडावर उभे राहून तरुणांनी जीवघेण फोटोसेशन केलं आहे. 

या हुल्लडबाजपणाहून जीव महत्वाचा नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

चिखलदऱ्यात अनेक जीवघेणे पॉइंट आहेत. त्यामुळे पर्यटकांनी तिथे फोटो सेशन करू नये अशा आशयाचे फलक लावूनही पर्यटक मात्र त्यातून काहीच बोध घेत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येण्याची मागणी करण्यात आली आहे.