Clean chit to Maharashtra deputy CM Ajit Pawar : अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या अवघ्या दोनच दिवसांत त्यांना मोठा दिलासा मिळालाय. हा दिलासा आहे तब्बल एक हजार कोटींच्या संपत्तीच्या मालकीचा. अजित पवारांची आयकर विभागाने जप्त केलेली हजार कोटींपेक्षाही जास्तची मालमत्ता दिल्ली लवादाच्या आदेशाने मुक्त करण्यात आलीय. शपथ घेतल्याच्या दोनच दिवसात हा निर्णय आल्याने चर्चा तर होणारच. लवादाच्या या निर्णयावरून विरोधकांनी अजित पवारांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजलि दमानिया यांनी संपत्ती मुक्त करण्याच्या निर्णयावर आक्षेत घेतलाय.
संपत्ती मुक्तच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या दमानियांचा आक्षेप घेतला आहे.
शाब्बास !
1000 कोटी?
भाजप ला पाठिंबा द्या, उप मुख्यमंत्रिपद घ्या'
आणि
जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात?
असं ट्विट अंजली दमानियांनी केले आहे.
अजित पवारांची संपत्ती मुख्य करण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. भ्रष्ट लोकांना पाठिशी घालण्याचं काम भ्रष्ट लोकांना पाठिशी घालण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'भाजपला शरण न गेलेल्यांवर फक्त कारवाई' होत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. भ्रष्टाचारी असतो तर माझ्यासोबत कोणी काम केलं नसतं, मला राजकीय अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिलंय.
अजित पवारांची संपत्ती मुक्त झाल्याने विरोधकांनी अजित पवार आणि भाजपविरोधात रान उठवल्याचं पाहायला मिळतंय. याच मुद्द्यावरून पुढल्या काही काळात विरोधक महायुतीला घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या काळात अजितदादा शिखर बँक घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाले होते. यावेळी त्यांची संपत्ती तंटामुक्त झालीय हा नक्कीच योगायोग नाही.