तळकोकणात औरंगजेबाच्या स्टेटसवरुन तणाव; पोलीस स्टेशनबाहेर नागरिकांची गर्दी

तळकोकणात औरंगजेबाच्या वादग्रस्त स्टेटसमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली होती.   

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2024, 12:33 PM IST
तळकोकणात औरंगजेबाच्या स्टेटसवरुन तणाव; पोलीस स्टेशनबाहेर नागरिकांची गर्दी title=

तळकोकणात औरंगजेबाच्या वादग्रस्त स्टेटसमुळे वाद निर्माण झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यात हा वाद झाला आहे. येथील काही मुलांनी सोशल मीडियावर औरंगजेब तसंच बाबरी मशिदीचा फोटो ठेवला होता. यानंतर परिसरात वाद निर्माण झाला आणि तणावाचं वातावरण होतं. या मुलांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठलं होतं. 

लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने रस्त्यावर गर्दी झाली होती. वेंगुर्ला तसंच सावंतवाडी पोलीस स्टेशनबाहेर कारवाईच्या मागणीसाठी गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांकडून यावेळी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न सुरु होता. पोलिसांनी परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवलं आहे.