मुंबई : राज्यात आज कोरोनाचे आणखी 2598 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता 59546 वर पोहोचली आहे. तर आज राज्यातील 698 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 18616 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 38939 रुग्ण उपचार घेत आहेत. देशात कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 59546. Today,newly 2598 patients have been identified as positive. Also newly 698 patients have been cured today,totally 18616 patients are cured &discharged from the hospitals. Total Active patients are 38939.
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 28, 2020
- नवी मुंबई आज 78 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांची संख्या 1931 वर
- कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 29 रुग्ण वाढले. एकूण रुग्णांची संख्या 911 वर
- धारावीत ३६ रूग्णांची वाढ, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १६७५ वर
- धुळे जिल्ह्यात 11 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांची संख्या 132 वर
- मालेगावात २६ कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांची संख्या ७४८ वर
- जालन्यात आणखी 5 रुग्ण वाढले, एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 115 वर
- पनवेलमध्ये आज 29 नवे रुग्ण आढळले, एकूण रुग्ण संख्या 520 वर
- सोलापुरात एका दिवसात ८१ कोरोना रूग्णांची वाढ, एकूण रूग्णांची संख्या ७४८ वर