मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 34 हजार 848 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून 960 रूग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 59 हजार 73 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकुण कोरोना रूग्णांची संख्या 53 लाख 44 हजार 63 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृत पावलेल्या रूग्णांची संख्या 4 लाख 94 हजार 32 इतकी आहे.
Maharashtra reports 34,848 new #COVID19 cases, 59,073 discharges and 960 deaths in the last 24 hours
Total cases 53,44,063
Death toll 80,512
Total discharges 47,67,053Active cases 4,94,032 pic.twitter.com/CUsl3PhxXo
— ANI (@ANI) May 15, 2021
मुंबईत देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 1 हजार 147 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 62 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. गेल्या 24 तासांत 2 हजार 333 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 36 हजार 674 इतकी आहे.
Mumbai reports 1,147 new COVID-19 cases, 2,333 recoveries, and 62 deaths in the last 24 hours
Active cases: 36,674
Total recoveries: 6,34,315
Death toll: 14,200 pic.twitter.com/ihgJ7QdA2o— ANI (@ANI) May 15, 2021
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 481 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज 783 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 447 इतकी आहे. आज 18 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात आज 618 कोरोना बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजार 511 आहे. जिल्हात आज 11कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.