डीएसकेंचा नीरव मोदी प्रमाणे किंवा त्याहून गंभीर गुन्हा : राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद

डीएसके घोटाळा हा देशात गाजत असलेल्या नीरव मोदी प्रकरणा इतकाच मोठा किंवा त्याहून गंभीर गुन्हा आहे, असे ताशेरे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने ओढलेत. 

सुरेंद्र गांगण | Updated: Mar 15, 2018, 11:38 PM IST
डीएसकेंचा नीरव मोदी प्रमाणे किंवा त्याहून गंभीर गुन्हा : राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद title=

पुणे : डीएसके घोटाळा हा देशात गाजत असलेल्या नीरव मोदी प्रकरणा इतकाच मोठा किंवा त्याहून गंभीर गुन्हा आहे, असे ताशेरे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने ओढलेत. 

तसंच डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांनी सर्वसामान्य जनतेचा पैसा कंपनीच्या आणि भागधारकांच्या हितासाठी न वापरता तो संचालकांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांकडे बेकायदा वळवल्याचेही लवादाने म्हटलंय. 

इतकेच नव्हे तर डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेडचे आजी माजी  संचालक, अधिकारी  आणि संबधित कंपन्या यांची बँक खाती गोठवण्याचे, लॉकर सील करण्याचे आणि मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्र, राज्य सरकार आणि इंडियन बँक असोसिएशनला दिलेत. 

या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेउन गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयाने केंद्र शासनाच्या वतीने एनसीएलटीकडे तक्रार केली होती.