मुंबई : राज्यातील राजकीय नाट्य सुरुच आहे. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात जमा झालेत. या राजकीय घडामोडीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवादात म्हटल्याप्रमाणे अखेर शासकीय निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडला आहे.
जाताना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावरील आपल्या स्टाफचीही भेट घेतली. यावेळी अनेक कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभे होते. यावेळी अनेकांनी त्यांना नमस्कारही केला. मोठ्या प्रमाणात त्यांच्याभोवती शिवसैनिकांचा गराडा होता.
ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी या सर्व कर्मचाऱ्यांना निरोप घेतला तेव्हा ही संपूर्ण हृदय पिळवटून टाकणारी होती. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर मुंबईभरातून शिवसैनिक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाले. नेहमी राडा करणाऱ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात काल अश्रू तरलळे होते. अखेर बुधवारी शेवटी आज 9 वाजून 45 मिनिटांनी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन मातोश्रीकडे निघाले.
वर्षाच्या दाराच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी उंबरठा ओलांडताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली.