नवी मुंबई : शेतकऱ्यांची महाराष्ट्र बंदची हाक आणि शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशी सुरु असल्याने सर्वसामान्यांचे हाल सुरु झालेत. दरम्यान, सर्वसामान्यांचे हाल होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येतेय. मुंबई बाजार समितीमध्ये ९९७ गाडयांची आवक झालीय. त्यात कांदा, बटाटा८९ गाडया तर भाजी २७७ गाड्या आवक झालीय.
शेतक-यांच्या संप माघारीवरुन आणि संप सुरुच राहणार या संभ्रमात कालचा दिवस गेला. संप मागे घेण्यात आला असं शनिवारी जाहिर करण्यात आलं, तरी महाराष्ट्रात संपाची दाहकता कायम आहे. प्रशासनाच्या पातळीवर बाजार सुरळीत राहून सर्वसामान्यांचे हाल होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येतेय.
दरम्यान, पुण्यात रात्री ११.३० पर्यत २६१ गाड्यांची आवक झाली होती. शेतकरी अजूनही संपाच्या पवित्र्यात असले तरी बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक सुरु झाल्याने बाजारपेठावरचा ताण काहीसा निवळल्याचे चित्र काल पाहायला मिळाले.