Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीला आंब्याच्या पानांचा असा करा वापर, बाप्पाच्या कृपेने व्हाल लखपती

Ganesh Chaturthi 2022 Yog: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती भक्तांच्या घरी विराजमान होतो. यावेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला येत आहे. 

Updated: Aug 27, 2022, 01:25 PM IST
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीला आंब्याच्या पानांचा असा करा वापर, बाप्पाच्या कृपेने व्हाल लखपती title=

मुंबई : Ganesh Chaturthi 2022 Yog: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती भक्तांच्या घरी विराजमान होतो. यावेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला येत आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता गणेश विसर्जनाच्या दिवशी होणार आहे. या 10 दिवसांत श्रीगणेशाची पुष्कळ पूजा केली जाते. त्याच्या आवडीच्या वस्तू त्याला अर्पण केल्या जातात.गणेश चतुर्थीला घरात बाप्पाची स्थापना केल्याने तो भक्तांची सर्व दुःखे दूर करतो असे म्हणतात. आणि त्याचे सर्व काम सुरळीतपणे पूर्ण होते. 

धर्मग्रंथानुसार या 10 दिवसात बाप्पा पृथ्वीवर येऊन लोकांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात आणि 10 दिवसांनी गणपती विसर्जन करुन आपल्या जगात परत जातात. या दिवशी गणेशाच्या काही आवडत्या वस्तूंनी मूर्ती सजवल्यास विशेष फळ मिळते, असे मानले जाते. भगवान गणेश भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. (Ganesh Ji Vastu Tips)

जास्वंदीचे फूल- गणेशाला लाल रंगाची फुले खूप आवडतात. ज्योतिषशास्त्रानुसार जास्वंदीची फुले नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. गणेशाची मूर्ती जास्वंदीच्या फुलांनी सजवली तर व्यवसायात प्रगती होते, असा समज आहे. यासोबतच नवीन संधीही निर्माण होतात. 

आंब्याची पाने- वास्तुशास्त्रात आंब्याच्या पानांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. घरामध्ये आंब्याची पाने लटकवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरामध्ये प्रवेश करताना बाहेरून येणारी हवा आंब्याच्या पानांना स्पर्श करून आत येते, तेव्हा त्यातून सकारात्मक ऊर्जा येते, असे म्हणतात. गणेशाच्या मूर्तीभोवती आंब्याची पाने ठेवल्याने उत्पन्न कमी होत नाही, असे म्हणतात. तसेच धन आणि अन्न घरात राहते. 
 
कडुलिंबाची पाने- हिंदू धर्मात कडुलिंबाची पाने देखील शुभ मानली जातात. क्रोध कमी करण्यासाठी शनिदेवाला कडुलिंबाच्या लाकडाने हवन करावे असे सांगितले जाते. यामुळे ते प्रसन्न होतात आणि देशवासीयांवर विशेष आशीर्वाद देतात. गमेशजीजवळ कडुलिंबाची पाने ठेवल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते असे म्हटले जाते. त्याचबरोबर सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि विश्वास वाढतो. 

 

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)