नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस

गेल्या २४ तासांत नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीची तिसरी घटना घडलीय

Updated: Aug 4, 2017, 12:04 AM IST
नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस

नाशिक :  नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला आहे. गेल्या २४ तासांत नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीची तिसरी घटना घडलीय. गंगापूरसारख्या उच्चभ्रू वस्तीत राहणा-या मीना साखला या ६८ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरुन चोरटे पसार झाले आहेत. 

पायाची शस्त्रक्रिया झालेली ही महिला घराजवळ वॉकर घेऊन फिरत असताना बाईकवरुन आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरलीय. चार ते साडेचार तोळे वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केलीय. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 

बुधवारीच नाशिक शहरातून दोन महिलांची सोनसाखळी चोरीला गेली होती. त्या घटनेचा अद्याप तपास लागलेला नसतानाच शहरात तिसरी सोनसाखळी चोरीची घटना घडली असून सोनसाखळी चोरांनी पुन्हा एकदा पोलीस अधिका-यांना आव्हान दिले आहे.