सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Solapur, Gram Panchayat Election) मतदानाच्या दिवशीच एक दुर्दैवी घटना घडली. अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावात एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उमेदवार सायबण्णा बिराजदार यांचा पहाटे 4 च्या निधन झालs. त्यामुळे बिराजदार उमेदवार असलेल्या संबंधित वार्डाची निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान संपले आहे. यामध्ये काही उदाहरणं दिसली ती लोकशाहीच्या उत्सवाचं महत्त्व पटवून देणारी. येवला तालुक्यातील बाभुळगावमध्ये एका वृद्ध महिलेने चक्क ऑक्सिजनवर असताना मतदान केलं. अँब्युलन्समध्ये बसून या आजी मतदानाला आल्या. कोळम येथील मतदानकेंद्रावर ऑक्सिजन सिलेंडरसह आलेल्या महिलेला बघून सर्वजण थक्क झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी अँब्युलन्समध्येच मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
गावगाड्याची निवडणूक#Election #Grampanchayatelection #GavgadyachyaBatmya pic.twitter.com/zDwvN8Kva7
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 15, 2021
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोहिते पाटील विरूध्द मोहिते पाटील अशा चुरशीत आरोप प्रत्यारोपानंतर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी झाल्या आहेत. भाजपकडून राष्ट्रवादी ने मतदान प्रक्रिया हायजॅक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आज मतदान दिवशी सकाळी पासूनच जनसेवा संघटनेचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर ठिय्या मारला. यावेळी जनसेवा संघटनेच्या पदाधिकारी महिलेस अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप डॉ. धवलसिंह यांच्या गटाने केलाय. तर अकलूज ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने हायजॅक केल्याचा आरोप भाजपने केला.