औरंगाबादमध्ये हुरड्याला काजूचा भाव

औरंगाबादेत हुरड्याला काजूचा भाव आला आहे, एक किलो हुरड्यासाठी आता थेट ६०० रुपये मोजावे लागताय.. 

Updated: Dec 30, 2017, 12:49 PM IST
औरंगाबादमध्ये हुरड्याला काजूचा भाव title=

विशाल करोळे औरंगाबाद : औरंगाबादेत हुरड्याला काजूचा भाव आला आहे, एक किलो हुरड्यासाठी आता थेट ६०० रुपये मोजावे लागताय.. 

औरंगाबादचा गुलमंडी बाजारात ग्रामीण भागातून येवून शेतकरी हूरडा विकतात, एरव्ही हुरड्याला १०० ते १५० रुपये किलो इतकाच भाव असतो मात्र आज या भावानं थेट ४ पट मजल मारीत एक किलो हुरड्यामागं ६०० रुपयांची मजल मारलीय.

खरं तर डिसेंबर महिन्यात हुरडा खाण्याची एक वेगळीच मजा असते, हुरड्याला खवय्यांची मोठी मागणी असते त्यामुळं अनेक ठिकाणी हुरड्या पार्टीसारखे प्रकारही सुरु झालेत त्यात घरी हुरडा खाण्यासाठी लोक गुलमंडी वरून घेवून जातात,  आता सीझन संपत आल्यानं हुरडा कमी झालाय आणि मागणी वाढली त्यात ३१ डिंसेबर आल्यानं मोठ्या प्रमाणात पार्टी साठी हुरडा नेला जावू लागला आणि त्यामुळंच हुरड्याचे भाव थेट ६०० वर पोहोचले,  य़ामुळं हुरडा विकणारे शेतकरी जाम खुश असून...३१ डिंसेबर पावला असंचं ते म्हणताय..

तर खाण्याला काय पैशांची चिंता, आवडीला मोल नाही असं सागत लोकही हुरडा खरेदी करताय.. हुरड्याची मजा ३१ डिसेंबरला चाखायचीच म्हणत लोक हुरड्यावर तुटून पडतायत..

हुरड्याची ही किंमत अगदी काजूच्या किमती इतकी झालीये, खर तर हुरड्याला इतका भाव मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी, मात्र हौसेला मोल नाही असं सांगत होवू दे तोटा, थर्टीफर्स्टं आहे मोठा असं सांगत लोकही हुरडा एन्जॉय करताय, आणि विकणारे शेतकरी सुद्धा...