'विश्वास बसणार नाही पण खरंय...' तुकाराम मुंढेंकडून सरकारी रुग्णालयाचं कौतुक

शासकीय रुग्णालयातील टीमचं भरभरून कौतुक 

Updated: Feb 9, 2021, 02:45 PM IST
'विश्वास बसणार नाही पण खरंय...' तुकाराम मुंढेंकडून सरकारी रुग्णालयाचं कौतुक title=

मुंबई : गडचिरोली हा महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भाग. या जिल्ह्यात आरोग्याच्या सेवेचा खूपच अभाव होता. एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी तेथील स्थानिकांना अनेक दिव्यातून जावं लागतं असे. कधी रुग्णाला पालखीतून तर कधी खांद्यावर घेऊन रुग्णालयात जावं लागत असे. मात्र आता तयार झालेलं गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. या रुग्णालयाचं आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भरभरून कौतुक केलं आहे. 

महत्वाची बाब म्हणजे गडचिरोलीतील या रुग्णालयाकरता तुकाराम मुंढे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. 'हेच खरं यश..' म्हणतं त्यांनी गडचिरोली रूग्णालयाच्या टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. 

'विश्वास बसणार नाही पण खरंय...' तुकाराम मुंढेंकडून सरकारी रुग्णालयाचं कौतुक तुकाराम मुंढेंनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे आहे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय. या रुग्णालयात प्रवेश केल्यावर तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलचा भास होईल. अतिशय स्वच्छ आणि सगळ्या सुविधांनी परिपूर्ण असं हे गडचिरोलीतील रुग्णालय. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयातील आयसीयू कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं.

तुकाराम मुंढेंनी रुग्णालयातील टीमचं भरभरून कौतुक केलं आहे. तुकाराम मुंढेंनी शेअर केलेल्या या ट्विटला ट्विटरवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे.