शिर्डीमध्ये अवैध व्यवसायांचं पेवं

शिर्डीमध्ये अवैध व्यवसायांचं सध्या पेव फुटलं असून काही भागात वेश्या व्यवसाय सुरु असल्यानं शिर्डी पोलिसांनी धाडसत्र सुरु केलंय. 

Updated: Jul 3, 2017, 07:07 PM IST

शिर्डी : शिर्डीमध्ये अवैध व्यवसायांचं सध्या पेव फुटलं असून काही भागात वेश्या व्यवसाय सुरु असल्यानं शिर्डी पोलिसांनी धाडसत्र सुरु केलंय. 

रविवारी संध्याकाळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये शहरातील सुतार गल्लीत दोन तरुणी सापडल्या असून याठिकाणी अवैध व्यवसाय सुरु असल्यानं पोलिसांनी पिटा अंतर्गत कारवाई केलीये. 

सध्या या तरुणी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असून अजून शहरातल्या किती लॉजेस आणि हॉटेलवर असे व्यवसाय चालतात याची माहिती घेतली जातेय.