सभेला दिव्यांग आल्याचे कळताच राज ठाकरे यांनी दिले 'हे' आदेश

राज ठाकरे यांचे सभास्थानी ठीक अकरा वाजता आगमन झालं. गणेश कला क्रीडा रंगमंच मनसैनिकांनी खच्चून भरलं होतं. घोषणा झाल्या आणि राज ठाकरे भाषणाला उभे राहिले.

Updated: May 22, 2022, 12:53 PM IST
सभेला दिव्यांग आल्याचे कळताच राज ठाकरे यांनी दिले 'हे' आदेश  title=

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची जोरदार चर्चा सुरु होती. राज ठाकरे यांना जवळून ऐकावं, त्यांची भेट घेता यावी यासाठी पुण्यासह पिंपरी चिंचवड येथी मनसैनिकांनी, तरुणांनी अलोट गर्दी केली होती.

राज ठाकरे यांचे सभास्थानी ठीक अकरा वाजता आगमन झालं. गणेश कला क्रीडा रंगमंच मनसैनिकांनी खच्चून भरलं होतं. घोषणा झाल्या आणि राज ठाकरे भाषणाला उभे राहिले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताच झी २४ तासच्या क्लिपचा उल्लेख केला. आजच्या सभेला काही दिव्यांग विद्यार्थी आले आहेत असं कळलं. कुठे आहेत ते? त्यांना सन्मानानं व्यासपीठावर घेऊन या असं आदेश मनसैनिकांना दिले.

त्यांच्या आदेशानुसार पदाधिकारी कामाला लागले. गर्दीतून वाट काढत ते त्या अंध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांना व्यासपीठावर घेऊन आले. ते दिव्यांग विद्यार्थी व्यासपीठावर येताच राज ठाकरे त्यांचा सत्कार करतील असे वाटत होते.

मात्र, राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या शेजारी खुर्च्या लावून त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना तेथे बसवलं. त्या दिव्यांग विद्यार्थी यांना केवळ राज ठाकरे यांचं भाषण ऐकायचं होतं. पण राज यांनी त्यांचा असा आगळावेगळा सन्मान केला.            

हे दिव्यांग विद्यार्थी पिंपरी चिंचवड येथून राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला आले होते. यातील करण अंबाड या दिव्यांगाने राज ठाकरे यांचे भाषण मला नेहमीच आवडते. त्यांनी भोंग्यांच्या मुद्यावरून जी भूमिका घेतली आहे. ती अधिक भावली. त्यांचे विचार पटतात यासाठी त्यांचे भाषण ऐकायला आल्याचे सांगितले.