अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : पेरणीच्या सुरवातीला निघालेले बोगस बियाणे त्यामुळे आले दुबार पेरणीचे संकट. त्यात कुठे कमी पाण्याने सोयाबीन मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यानंतर आलेल्या कोरोना व्हायरस ने तर शेतकऱ्याच कंबरडच मोडून टाकलं, एवढं कमी म्हणून की काय मोठ्या मेहनतीने पिकवलेलं सोयाबीन हात तोंडाशी आलं अन् खोड माशी या रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिवळं पडण्यास सुरवात झाली.
यामुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील सोयाबीन हे खराब झाले आहे. त्यामुळे आता उत्पन्न होण्याची आशा नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीच्या उभ्या पिकात वखर टाकून पीक मोडून टाकले आहे.
अमरावती जिल्ह्यासह सर्विकडे खोडमाशी या रोगाने सोयाबीनच्या पिकांवर हल्ला केला आहे. या रोगाच्या प्रादुर्भावात सोयाबिन पीक पिवळे पडत असून झाड पूर्ण पणे सुकून जात आहे. अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील सोयाबीन पिकाने शेतकऱ्याच तेल काढलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव येथील अरुण पुरी या अल्पभूधारक शेतकऱ्याने यावर्षी उसनावर पैसे आणून आपल्या दीड एकर शेतात सोयाबीन ची पेरणी केली होती. सुरवातीला असलेला कमी पाऊस त्यात बोगस बियाणं यामुळे त्यांच्या वर दुबार पेरणीच संकट ओढवल कसे बसे त्यांनी दुबार पेरणी केली.
सोयाबिनला वेळेवर खत फवारणी केली पण पंधरा दिवसा पूर्वी खोड माशी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि हाता तोंडाशी आलेलं सोयाबीन वाळू लागल यातुन एक रुपयाच ही उत्पन्न होणार नाही म्हणून हतबल झालेल्या या शेतकऱ्यांने बैल जोडी लावून शेतातील सोयाबीन मोडून टाकले.
दरवर्षी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी करनार हुकमीच पीक म्हणून सोयाबीन कडे पाहल्या जाते मात्र मागील वर्षी एन काढनीच्या वेळेला आलेला अवकाळी पाऊस याने सोयाबीनचे नुकसान केलें तर आता हात तोंडाशी आलेलं पीक पुरत सोकुन गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.