जळगाव : जळगावमधील सरकारी गोदामातल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यात भारतीय खाद्य महामंडळाची पथकं तळ ठोकून आहेत. एफसीआयकडून वाटपासाठी आलेले धान्य आणि रेशन दुकानांसाठी वाटप केलेल्या मालाची तपासणी पथकांकडून करण्यात येतंय.
दरम्यान तीन ते चार दिवस गोदामांची तपासणी होणार असून घोटाळा निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी ठेकेदारांवर करण्यात येणार असल्याची माहिती पथकातील अधिका-यांनी दिलीय. भुसावळमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी धाड टाकून धान्य घोटाळा उघडकीस आणला होता.