महाराष्ट्रातील सर्वात डेंजर आरोपी! धावत्या ST बसमध्ये हत्या, न्यायाधीशांसमोर जीव घेण्याचा प्रयत्न, जेलमधून धमकीची पत्र आणि...

 धावत्या एसटी बसमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  पुण्याच्या खेडमधील 2018च्या हत्येचा निकाल लागला आहे.  

वनिता कांबळे | Updated: Feb 10, 2025, 06:43 PM IST
महाराष्ट्रातील सर्वात डेंजर आरोपी! धावत्या ST बसमध्ये हत्या, न्यायाधीशांसमोर जीव घेण्याचा प्रयत्न, जेलमधून धमकीची पत्र आणि...   title=

Pune Crime News: 2018 मध्ये महाराष्ट्रात थरारक हत्याकांड घडले होते. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपीचे कृत्य पाहून कोर्टाने कठोर निर्णय घेतला आहे. आरोपीने धावत्या बसमध्ये मामाच्या मुलाची हत्या केली. यानंतर त्याने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांसमोर मामाच्या मुलीचा  जीव घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी जेलमधून मामाच्या मुलीला धमकीची पत्र पाठवत होता. एकतर्फी प्रेमातून आरोपीने मामाचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला.  

धावत्या एसटीत मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस पी पोळ यांनी ही शिक्षा सुनावली. अजित कान्हूरकर असं आरोपीचं नाव आहे. मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून पुण्याच्या खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 12 जून 2018 ला घडलेल्या हत्येचा तब्बल साडे सहा वर्षानंतर निकाल लागलाय. अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते, त्यामुळं मामाचा अन मुलीचा ही लग्नास नकार होता. या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितने ठरवलं. याची सुरुवात मामाचा 18 वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसे पासून त्याने केली. 

श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी एसटीतून खेडच्या दिशेने निघाले. त्यावेळी मागच्या सीट वर बसलेल्या अजितने धारदार शस्त्राने सपासप वार केले. अटकेनंतर ही अजित तुरुंगातून पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता, इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोर ही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहता आरोपी तुरुंगाबाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता अजितला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील म्हणून सागर कोठारी यांनी कामकाज पाहिलं.