अमिताभ आणि रेखाच्या नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हाकडून खुलासा; 'ते दोघे मेकअप रुममध्ये...'

अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे नाते अनेक वर्षांपासून बॉलिवूड चर्चेचा एक प्रमुख विषय राहिले आहे. 'दो अंजाने' चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर ते बऱ्याच वेळ चर्चेत राहिले. 

Intern | Updated: Feb 10, 2025, 05:30 PM IST
अमिताभ आणि रेखाच्या नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हाकडून खुलासा; 'ते दोघे मेकअप रुममध्ये...' title=

चित्रपटाच्या शूटींग दरम्यान अमिताभ बच्चन विवाहित होते आणि रेखा त्यांच्या आयुष्यात एक गहिरा भाग बनली होती. अमिताभ यांनी कायम या अफवांना नाकारले आणि रेखासोबत त्यांच्या कोणत्याही प्रेमसंबंधांचा खुलासा केला नाही. परंतु, रेखा यांनी अमिताभ यांच्यावर प्रेम असल्याचे संकेत अनेक वेळा दिले आहेत.

अमिताभ आणि रेखा यांच्यातील नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांचे मत ऐकायला मिळाले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी एकदा रेखा यांना दोषी ठरवले होते, कारण त्यांच्यावर आरोप होता की त्या अमिताभ आणि त्यांच्यातील दुरावा निर्माण करणाऱ्या आहेत. 1970 च्या दशकात अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे एकत्र काम करणारे काही हिट चित्रपट होते, परंतु कालांतराने दोघांमध्ये एकमेकांशी संवाद कमी होऊ लागले. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचा 'एनिथिंग बट खामोश: द शत्रुघ्न सिन्हा' या शोमध्ये त्यांनी यावर खुलासा केला. 

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, 'काळा पत्थरच्या सेटवर एक नायिका अमिताभ यांना भेटायला येत असे, ती 'दोस्ताना' दरम्यानही यायची, पण त्यांनी एकदाही तिला बाहेर काढले नाही किंवा आमच्यापैकी कोणाशीही तिची ओळख करून दिली नाही. पण ही गोष्ट शोबिझपासून लपून राहू शकत नाही.' यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी रेखावरील टीका केली. शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ यांचे संबंध तणावपूर्ण होऊ लागले होते.

हे ही वाचा: आधी नकार, समजूत अन् मग होकार! सुपर हीट ठरलेला ऋषी कपूरचा 'हा' चित्रपट; कमाईसोबत मिळवला 'कल्ट क्लासिक'चा दर्जा

शत्रुघ्न सिन्हा यांनी आणखी एक खुलासा केला की, त्यांचे आणि रेखा यांचं नातं कधीच सुसंवादी नव्हते. दोघांमध्ये मतभेद होते, ज्यामुळे दोन दशकांहून अधिक काळ संवाद बंद झाला. शत्रुघ्न यांनी सांगितले, 'आमच्यात एक मूर्ख मुद्द्यावर मतभेद झाले आणि त्यानंतर आम्ही 20 वर्षांहून अधिक काळ एकमेकांशी बोललो नाही. मी तिची चेष्टा केली, जे मला नाही करायला हवं होतं आणि तिने कधीच सूड घेतला नाही.'

शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी, पूनम सिन्हा यांनी या वादांमध्ये हस्तक्षेप करून यांची भेट घडवून आणली. शत्रुघ्न म्हणाले, 'पूनम आणि रेखा खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यांची मैत्री बिघडत होती, पण तरीहू पूनमने आमच्या वाद मिटवण्यास मदत केली. तिने आम्हाला भूतकाळ विसरून पुढे जाण्यास सांगितले आणि आम्ही ते ऐकुन एकमेकांना माफ केले.'

शत्रुघ्न सिन्हा यांच्या या खुलाशामुळे त्यांच्या आणि रेखा यांच्यातील वादावर नवा प्रकाश पडला आहे.