Rinku Rajguru and Krishnaraj Mahadik: युट्यूबर, समाजसेवक आणि उद्योजक कृष्णराज महाडिक हे सोशल मीडियात खूप सक्रिय असतात. आपल्या समाजकार्याचे व्हिडीओ ते नेहमी शेअर करत असतात. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे, जो कृष्णराज महाडिकांवर प्रेम करतो. खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र असलेले कृष्णराज कधी गावचा खराब झालेला रस्ता चांगला करताना तर कधी अनाथांना दत्तक घेताना दिसतात. आपल्या खासगी, व्यावसायिक आयुष्यातील अपडेट ते सोशल मीडियात देत असतात. दरम्यान त्यांनी एक फोटो फेसबुकवर शेअर केलाय. ज्याची सोशल मीडियात खूप चर्चा रंगलीय.
उद्योजक कृष्णराज महाडिक यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच्यासोबत एक फोटो शेअर केलाय. 'आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.' असे कॅप्शन या फोटोवर देण्यात आले आहे. सैराट सिनेमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या आपल्या करिअरच्या शिखरावर आहे. तिने नुकतेच महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी कृष्णराज महाडीक हे तिच्यासोबत होते. रिंकूदेखील सोशल मीडियात खूप प्रसिद्ध आहे. मराठमोळी अभिनेत्री रिंकू आता बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावतेय. ती स्वत:च्या फिटनेसकडेही खास लक्ष देत असते. दरम्यान रिंकू राजगुरु आणि कृष्णराज महाडिक यांचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाहीय. फोटोवर दोघांचे चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.
कृष्णाला राधा शोभते, अशी प्रतिक्रिया एका युजरने केलीय. गरीबाची मुलगी आहे आपल्या कोल्हापूरमध्ये येऊन दे आणि आपल्या घरामध्ये शोभते. बिनधास्त करा, असा सल्ला दुसऱ्या एका युजरने कृष्णराज महाडिकांना दिलाय. जमतंय का बघा..जोडी शोभून दिसते, अशा प्रतिक्रिया नेटकरी दोघांच्या फोटोवर देत आहेत.
कृष्णराज महाडिक हे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आहेत. कृष्णराज महाडीक यांनी जागतिक रेसिंगमध्ये आपला ठसा उमटाविला आहे. ते एक प्रसिद्ध युट्युबर आहेत. महाडिक पाटर्न या युट्युबवरून ते स्वतःच्या कुटूंबाचे किस्से ते शेअर करतात. या युट्युबमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते समाजकार्य करतात. लाखो फॉलोअर्स युट्युबच्या माध्यमातून जोडले गेले आहे. नुकताच झालेली विधानसभा निवडणूक लढविणार होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा मधून ते इच्छुक होते.