मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे विचारता, बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सुस्कंतपणे पुढे नेली, सुस्कृतपणा बरेच वर्ष आम्ही सांभाळला, पण हे जास्तच चेकाळले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला बाळासाहेबांची शिवसेना दिसेल, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
आज सबका हिसाब बराबर होगा, भाजपचे जे काही बोलघेवडे आहेत त्यांना हा इशारा आहे,असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
आज सर्वांचं लक्ष लागलंय ते शिवसेना नेते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे. आता थोड्याचवेळात संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन एक गौप्यस्फोट करणार आहेत.
कालच राऊतांनी भाजपला धमकीवजा इशारा दिलाय. सध्या जेलमध्ये असलेल्या अनिल देशमुखांच्या जागी भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील, असा बॉम्बगोळा राऊतांनी टाकलाय...त्यामुळे ते भाजपचे साडेतीन नेते कोण आहेत? राऊत आज कोणता बॉम्ब टाकणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलीय.