नाशिक : नाशिक महानगरपालिका रुग्णालयांची अनास्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर रिक्षातच एका महिलेची प्रसुती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रेया साकेत असं या महिलेचं नाव आहे.
दिंडोरी रोडवरील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहात ही धक्कादायक घटना घडलीय. श्रेया साकेत नावाच्या या महिलेला प्रसुती कळा असह्य झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, आया कुणीही उपस्थित नसल्यामुळे ही महिला भररस्त्यात रिक्षातच बाळंत झाली.
सुदैवानं बाळ बाळंतीण दोघेही सुरक्षित आहेत.