Maharashtra Breaking News LIVE Update : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. विधानसभा लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार. महायुती आणि मविआतील बंडखोर अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष. जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
4 Nov 2024, 12:59 वाजता
सदा सरवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल
4 Nov 2024, 12:32 वाजता
रायगड - अलिबाग मधून काँग्रेस बंडखोर राजेंद्र ठाकूर यांची माघार
अलिबाग मधून काँग्रेस बंडखोर राजेंद्र ठाकूर यांनी माघार घेत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ठाकूर यांनी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळं आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र श्रीवर्धन मधून राजेंद्र ठाकूर यांची बंडखोरी अद्याप कायम. परिणामी
श्रीवर्धनच्या जागेबाबत तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार.
4 Nov 2024, 12:00 वाजता
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
आताच्या क्षणाची मोठी बातमी, उपलब्ध माहितीनुसार राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली. मविआच्या मागणीला यश. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर रश्मी शुक्ला यांची बदली. पोलीस महासंचालकपदी नवी नियुक्ती केली जाणार.
4 Nov 2024, 11:40 वाजता
सदा सरवणकरांकडून त्यागाची भाषा, पाहा नेमकं काय म्हणाले...
'बाळासाहेबांचे विचार विधानसभेत जाणं गरजेचं. मी निवडणूक लढवलतोय ती माझ्यासाठी वैयक्तिक नाही. मी टाकलेली अट जर मान्य होत असेल, तर कार्यकर्त्यांशी तुम्ही बोला आणि अंतिम निर्णय कळवा असं सदा सरवणकर सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना बोलले. आम्ही आता चर्चा करू आणि त्यानुसार निर्णय घेऊ. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमाची स्थिती कायम. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत हाच आमचा हेतू. जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आवश्यक भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. हा त्याग शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी किती फायद्याचा ठरेल हे पाहणं गरजेचं. मी अर्ज मागे घेणार नाही, पण कार्यकर्त्यांचा विचारही मला करावा लागेल. मी मुख्यमंत्र्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या असून, त्याला अपेक्षित उत्तर कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच मिळेल.'
4 Nov 2024, 10:30 वाजता
मुंबईतील बंडखोरी रोखण्यात भाजप यशस्वी
मुंबईतील बंडखोरी रोखण्यात भाजप यशस्वी. भाजपचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्यात भाजपाला यश. गोपाळ शेट्टी यांची निवडणुकीतून माघार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश. आपला मुद्दा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे असं म्हणत गोपाळ शेट्टी यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
4 Nov 2024, 10:21 वाजता
अलिबाग, पेण, पनवेल शेकापसाठी सोडणार - संजय राऊत
दुपारपर्यंत उमेदवारांचं चित्र स्पष्ट होईल, शेकाप नेत्यांशी चर्चा झाली असून, यानंतर आता पुढची वाटचाल असेल असं म्हणत मविआतील तिन्ही पक्ष आघाडी धर्म पाळणार असं संजय राऊत म्हणाले. यावेळी अलिबाग, पेण, पनवेल शेकापसाठी सोडणार असल्याचं मोठं वक्तव्यही त्यांनी केलं.
4 Nov 2024, 10:15 वाजता
कोल्हापूर मध्ये काँग्रेसच टेन्शन वाढलं
कोल्हापुरातील बंडोखोर उमेदवार राजेश लाटकर नॉट रिचेबल. राजेश लाटकर यांच्याकडून कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे संकेत. राजेश लाटकर सकाळपासून अज्ञातस्थळी. काँग्रेस कडून अधिकृतरित्या दिलेली उमेदवारी काही तासात नाकारल्यानंतर राजेश लाटकर आहेत नाराज. नाराजी दूर करण्यासाठी खासदार शाहू छत्रपती यांच्यासह मधुरिमा राजे छत्रपती यांनी घेतली होती लाटकर यांची भेट. बंडखोरी रोखण्यात काँग्रेस नेते सतेज पाटील यशस्वी होतात का? याकडे लक्ष.
4 Nov 2024, 09:58 वाजता
विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे यांची माघार
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. रविवारी जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे.
4 Nov 2024, 09:53 वाजता
लांजा मतदारसंघात दोन विरोधक एकाच मंचावर
रत्नागिरीतील लांजा मतदारसंघात दोन विरोधक एकाच मंचावर पाहायला मिळाले. दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजन साळवी आणि किरण सामंत यांनी हजेरी लावलीय. दोघेही एकाच मंचावर उपस्थित होते. साळवी आणि सामंत यांच्यात राजापूर मतदारसंघात लढात पाहायला मिळणार आहे.
4 Nov 2024, 09:50 वाजता
उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी कोकणावर विशेष लक्ष
उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी कोकणावर विशेष लक्ष दिलं आहे. विधानसभेच्या प्रचाराची सुरूवात कोकणातून केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेणार असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 मतदारसंघात शिवसेने विरूद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे.