Maharashtra Breaking News LIVE: SC मध्ये उद्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मुद्द्यांवर धुमश्चक्री सुरू असतानाच बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....   

Jan 27, 2025, 21:51 PM IST
Maharashtra Breaking News LIVE:  SC मध्ये उद्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात राज्यात नेमक्या कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार, कोणत्या निर्णयाचा सामान्यांवर परिणाम होणार? पाहा गल्लीबोळापासून दिल्लीपर्यंत कोणत्या बातम्यांवर असणार सर्वांचं लक्ष? 

27 Jan 2025, 21:48 वाजता

SC मध्ये उद्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी 

सर्वोच्च न्यायालयात उद्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सकाळी 11-12 च्या आत सुरु होणार आहे.  दोन वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयासमोर आहे.

27 Jan 2025, 20:28 वाजता

दिल्लीच्या बुराडी येथे 4 मजली इमारत कोसळली

दिल्लीच्या बुराडी येथे 4 मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. यात अनेक मजूर आत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

27 Jan 2025, 19:36 वाजता

धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे अजित पवारांना दिले- अंजली दमानिया 

धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे अजित पवारांना दिले-. त्यांचा तातडीने राजीनामा घ्या, अशी मागणी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.

27 Jan 2025, 18:35 वाजता

पुण्यातील कोंढवा परिसरात तरुणाची निर्गुणपणे हत्या

पुण्यातील कोंढवा परिसरात तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे. दशक्रिया विधी भैरवनाथ मंदिरासमोर काठी आणि सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून तरुणाचा खून करण्यात आला. मल्लेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून आर के कॉलनी गोकुळ नगर कोंढवा येथे तो वास्तव्यास होता. याप्रकरणी दोन सराईत ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

27 Jan 2025, 17:15 वाजता

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून ठाकरेंची रणनीती

शिवसेना ठाकरे गटाची ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने  उद्धव ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महापालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून ठाकरेंची रणनीती आखण्यात आली. ठाणे महापालिका आपलीच आहे आणि आपलीच राहणार, याचा विचार करून आतापासून तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. उद्धव ठाकरे यांनी आता मुंबईनंतर ठाणे महापालिकेकडे विशेष लक्ष देत आढावा बैठक आज घेतली. यामध्ये राजन विचारे केदार दिघे ठाण्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

27 Jan 2025, 16:53 वाजता

वरळीचे आमदार आदित्य ठाकरे एसआरए कार्यालयात

शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे एसआरए कार्यालयात दाखल झाले आहेत. मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत किशोरी पेडणेकर,आशिष चेंबुरकर सोबत आहेत. 

27 Jan 2025, 16:01 वाजता

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षने कंबर कसली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपली. 
पक्षाच्यावतीने प्रतेक सोमवारी पालिकेच्या एका मुद्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. फूटपाथ, आरोग्य , पालिकेच्या शाळा, झोपडपट्ट्यांचा मुद्दा आणि वाहतूक या विषयावर प्रत्येक सोमवारी आंदोलन करा. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने सूचना देण्यात आल्या. प्रत्येक वॉर्डमध्ये एका नेत्याला पालक नेता नियुक्त करण्यात येणार आहे.

27 Jan 2025, 14:25 वाजता

प्रिमियरआधी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घ्या- प्रताप सरनाईक 

छावा चित्रपट वादावर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निर्माते म्हणून दिग्दर्शक म्हणून आधीच हा विचार करायला हवा, राजकीय नेत्यांना आक्षेप घ्यायची वेळच का येते? त्यांना का बोलावे लागते हे देखील बघावे लागेल,प्रीमियर करण्याच्या आधी इतिहास तज्ञ यांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकावे, असे सरनाईक म्हणाले.

27 Jan 2025, 13:38 वाजता

हिंगोली-जिल्ह्यात एसटी भाडेवाडी विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चक्का जाम आंदोलन

राज्य परिवहन महामंडळाने तिकिटात केलेली 15 टक्के दरवाढी विरोधात आज शिवसेनाने चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा आणि हिंगोली येथे शिवसेनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले, तिकिटात महिलांना 50 टक्के सूट देऊन 15 टक्के भाडे वाढ करणे ही प्रवाश्यांची शुद्ध फसवणूक असून एसटी महामंडळाने जाहीर केलेली भाडेवाढ कमी अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आली, वेळीच भाडे वाढ रद्द करावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन उभारण्याचा ईशारा यावेळी शिवसेना उबाठा गटाकडून देण्यात आलाय. 

27 Jan 2025, 13:36 वाजता

बंगळुरू- पुणे महामार्गावर पुलाचा कठडा तोडून एसटी बस ओढ्यात कोसळली

सांगलीच्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडला आहे.यामध्ये 35 प्रवासी हे जखमी झाले आहेत.जखमींना इस्लामपूर इथल्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. सातारच्या दहिवडी एसटी आगाराची असणारी ही बस कोल्हापूरच्या जोतिबा डोंगराला निघाली होती.सांगलीच्या पुणे-बंगळूरु महामार्गावरील तांदूळवाडी या ठिकाणी पोहोचली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कठडा तोडून बस थेट ओढ्यावरील असणाऱ्या पुलावरून खाली कोसळले,ज्यामध्ये एसटीतील 35 प्रवासी जखमी झालेत,जखमी प्रवाश्यांना कोल्हापूरच्या शासकीय आणि इस्लामपूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.तर केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचे जीव वाचले आहेत.