Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात राज्यात नेमक्या कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार, कोणत्या निर्णयाचा सामान्यांवर परिणाम होणार? पाहा गल्लीबोळापासून दिल्लीपर्यंत कोणत्या बातम्यांवर असणार सर्वांचं लक्ष?
27 Jan 2025, 13:35 वाजता
विक्रोळी रेल्वे स्थानकात प्रेमी युगुलाची आत्महत्या
विक्रोळी रेल्वे स्थानकावर प्रेमी युगुलाने एक्सप्रेस समोर उडी मारून केली आत्महत्या. वीस वर्षाचा लकी तंगडपल्ली आणि 15 वर्षाच्या शगुन दुबे या दोघांनी केली आत्महत्या. दोघे देखील भांडुपचे रहिवासी.
प्रेमास घरच्यांचा विरोध होता म्हणून केली आत्महत्या.
27 Jan 2025, 13:33 वाजता
सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एसआयटीचा बीड जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज
आरोपी सुदर्शन घुले संदर्भात काही पुरावे सापडल्यामुळे एसआयटी कडून पुन्हा सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज मकोका विशेष न्यायाधीश सुरेखा.आर.पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडांमध्ये आणि खंडणी प्रकरणांमध्ये आरोपी आहे. त्याचबरोबर मकोका अंतर्गत कार्यवाही झाली आहे. सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हे तर आरोपीचे वकील तिडके हजर राहतील. सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असता त्यावेळेस पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवावा असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते.
27 Jan 2025, 12:51 वाजता
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण; गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मोठी मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात येत आहे. खून किंवा बलात्कारासारख्या गंभीर प्रकारातील गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळीचे रक्ताचे तसेच डीएनए नमुने गोळा करण्यासाठी या व्हॅनमधील आधुनिक तंत्रज्ञानाची मोलाची मदत होणार आहे. याशिवाय घटनास्थळी जाऊन फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफी ही करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची या लोकार्पण सोहळ्यात विशेष उपस्थिती आहे.
27 Jan 2025, 12:02 वाजता
संभाजीराजे छत्रपतींसाठी 'छावा' चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग, कारण म्हणजे...
छत्रपती संभाजीराजेंसाठी मॅडॉक चित्रपट निर्मित्यांकडुन 'छावा' चित्रपट पडताळणीसाठी विशेष शोचे आयोजन करण्यात आलं आहे. 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलर वरुन उठलेल्या वादंगामुळे चित्रपट निर्मात्यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती व इतिहास अभ्यासकांसाठी खास शोचे आयोजन केले आहे. दि 29 जानेवारी रोजी मुंबई मध्ये या खास शोचे आयोजन करण्यात आले आहे.
27 Jan 2025, 11:35 वाजता
'छावा'तील आक्षेपार्ह दृश्यासंदर्भात उदय सामंत यांचा स्पष्ट इशारा, म्हणाले...
दिग्दर्शक, निर्मात्यांशी बोलणं झालं नसून, छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजेंशी बोलणं झालं. निर्माता किंवा दिग्दर्शकावर आक्षेप घेतलेला नाही. नजरचुकीनं असा सीन अनावधानानं आला असेल तर तो डिलीट करावा अशी सर्वांची मागणी आहे, असं म्हणत इशारावजा वक्तव्य उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं.
27 Jan 2025, 11:08 वाजता
'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ येथे पोहोचले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर देखील पोहोचले. 'छावा' सिनेमामध्ये संभाजी महाराज यांची भूमिका करणा-या विकी कौशलने एका गाण्यात डान्स केला आहे, या संदर्भात आक्षेप घेतला जात असून, याच विषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक राज ठाकरेंची भेट घेतायत.
27 Jan 2025, 11:06 वाजता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबूराव चांदेरे यांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची दखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबूराव चांदेरे यांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. एका व्यक्तीला बाबुराव चांदेरे मारहाण करत असल्याचा व्हिडीओ झाला होता वायरलय. अजित पवारांच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव वापरून कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही - अशी पक्षाने भूमिका घेतल्याची माहिती. बाबुराव चांदेरे यांच्या याआधी देखील पक्षाकडे मारहाण आणि दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी. कबड्डी असोसिएशनमधील मनमानी कारभाराचा देखील पक्षाकडे तक्रारी.
27 Jan 2025, 10:29 वाजता
आज शिंदे- फडणवीस यांच्यात बैठक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक. जलसंपदा विभागाची दुपारी २ वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार. मुख्यमंत्री दावोसमधून आल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदाच बैठक.
27 Jan 2025, 10:27 वाजता
जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.जरांगे यांच्या सोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आलीय.आज सकाळी ही तपासणी करण्यात आलीय.
27 Jan 2025, 10:17 वाजता
ठाण्यातील घोडबंदर रोड येथे ट्रकचा अपघात
ठाणेवरून घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवरती वाघबीळ ब्रिज जवळ ट्रक डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाला होता तसेच. सदर वाहनाचे इंजिन ऑईल टॅंक लिकेज होऊन रोडवरती ऑईल सांडले आहे. सदर घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित आहेत. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर घटनास्थळी अपघातग्रस्त ट्रेलर वाहन 01-हायड्रा मशीन व 02-क्रेन मशीनच्या साहाय्याने व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने रोडच्या एका बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने रोडवरती सांडलेला ऑईलवरती माती पसरविण्यात आली आहे. घटनास्थळी अपघात झाल्यामुळे ठाणेवरून घोडबंदरकडे जाणारी वाहतूक वाघबीळ येथे धिम्यागतीने सुरू आहे होती.