Maharashtra Breaking News LIVE: SC मध्ये उद्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मुद्द्यांवर धुमश्चक्री सुरू असतानाच बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....   

Jan 27, 2025, 21:51 PM IST
Maharashtra Breaking News LIVE:  SC मध्ये उद्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात राज्यात नेमक्या कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार, कोणत्या निर्णयाचा सामान्यांवर परिणाम होणार? पाहा गल्लीबोळापासून दिल्लीपर्यंत कोणत्या बातम्यांवर असणार सर्वांचं लक्ष? 

27 Jan 2025, 09:20 वाजता

देशात सगळीकडे एकच वेळ असावी यासाठी हालचाली... 

सरकारने सर्व अधिकृत आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर वेळेचं मानक निश्चित करण्यासाठी भारतीय प्रमाणवेळेचा वापर बंधनकारक करणाऱ्या नियमांचा मसुदा तयार केला आहे. ग्राहक मंत्रायलाकडून १४ फेब्रुवारीपर्यंत यावर प्रतिक्रिया मागितल्या आहेत. कायदेशीर, प्रशासकीय, व्यावसायिक आणि अधिकृत कागदपत्रांवर एकमेव वेळेचा संदर्भ म्हणून IST बंधनकारक केले आहे. वेळेबाबत तयार करण्यात आलेल्या मसुद्यानुसार, व्यावसायिक, परिवहन, सार्वजनिक प्रशासन, कायदेशीर करार, आर्थिक व्यवहारांसह सर्व क्षेत्रात आयएसटी हे प्रमाण वेळेचा संदर्भ म्हणून बंधनकारक असेल.

27 Jan 2025, 09:18 वाजता

ग्री स्टॅगच्या माध्यमातून बोगस पिक विमा थांबवणार

ग्री स्टॅग च्या माध्यमातून राज्यातील बोगस पिक विमा थांबेल असा विश्वास कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलेला आहे. राज्यभरामध्ये मार्च अखेरपर्यंत ॲग्री स्टॅग चे काम पूर्ण केले जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा आणि आधार कार्ड लिंक केले जाईल. यामुळे कुठलाही बोगस शेतकऱ्याला पिक विमा काढता येणार नाही, असं कोकाटे यांनी स्पष्ट केलेला आहे. राज्यांमध्ये कृषी योजनांमध्ये सुसूत्रीकरण आणणे आणि बोगस लाभार्थी योजनांचा लाभ घेणार नाही यासाठी दक्षता घेतले जात असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केला आहे. ॲग्री स्टॅग साठी भूमी अभिलेख, महसूल कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अद्यावत माहिती उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून योजनांचा लाभ देणं सोयीस्कर व सुलभ राहील असं माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे. 

27 Jan 2025, 09:04 वाजता

सैफ हल्ला प्रकरणी संशयित म्हणून पकडले आणि आयुष्य उध्वस्त झाले

16 जानेवारीला सैफ आली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला.त मुंबई पोलिसांनी गुन्हा दखल करून आरोपीचा शोध सुरू केला सीसीटिव्ही तपासून आरोपीचा फोटो आणि व्हिडीओ प्रकाशित झाला. संशयित म्हणून काही जणांना ताब्यात घेतले चौकशी केली सोडून दिले. 18 जानेवारीला दुर्ग रेल्वे सुरक्षा दलाने संशयित म्हणून आकाश कनोजिया याला ताब्यात घेतले आणि मुंबई पोलिसांना कळवले.

27 Jan 2025, 08:29 वाजता

बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलीसांची विशेष मोहीम

नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात विशेष मोहीम राबविलेय. यामध्ये एकाच वेळी 16 पथकांच्या माध्यमातून शहरातील 12 विविध ठिकाणी कारवाई करण्यात आलेय. या विशेष कारवाईत एकूण 265 संशयित नागरिकांना ताब्यात घेण्यात आले ज्यामध्ये 7 अवैधरित्या भारतात वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिक आढळून आले. नेरुळ पोलीस ठाण्यात 4, तुर्भे मध्ये 2 आणि नेरुळ मध्ये एका बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या दोन नागरिकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

27 Jan 2025, 08:28 वाजता

खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर 

खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीला लावणार हजेरी. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने घेणार संघटनात्मक बैठक. शहरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत करणार मार्गदर्शन!

27 Jan 2025, 07:38 वाजता

उद्धव ठाकरेंसोबत दोनच आमदार शिल्लक राहतील 

उद्धव ठाकरेंसोबत दोनच आमदार शिल्लक राहतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय. तर भविष्यात धाराशिव जिल्ह्यात राजकीय बदल झाले तर वावगं वाटायला नको. असं म्हणत सरनाईकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचे संकेत दिले आहेत. यावर निंबाळकरांनी मात्र मौन बाळगलं.

 

27 Jan 2025, 07:37 वाजता

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका. आजपासून कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणा-या पुलावरून वाहतूक सुरू. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे 15 मिनिटांत शक्य. 

 

27 Jan 2025, 07:07 वाजता

पालकमंत्रिपदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी महत्वाचं विधान

रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी महत्वाचं विधान केलंय... पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे... पण जर तुम्ही व्यवस्थित राहिला असतात तर आम्ही त्याचाही विचार केला असता असं गोगावले म्हणालेत... तुम्ही तुमची असलियत दाखवली आता आम्ही आमची असलियत दाखवतो अस गोगावले म्हणाले.

 

27 Jan 2025, 07:06 वाजता

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 48 दिवस पूर्ण झालेत. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा शोध  पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत मात्र अजूनही तो तपास यंत्रणेंना गुंगारा देतोय. बीड पोलिसांनी  त्याला फरार घोषित केलंय. कृष्णा आंधळेची माहिती देणा-यांना पोलिसांनी बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. मात्र तरीही आंधळेंचा पत्ता अद्याप लागलेला नाहीये. 

 

27 Jan 2025, 07:05 वाजता

राज्यातील एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

राज्यातील एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक. शिवसेना UBT मराठवाड्यात आंदोलन करणार. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये आंदोलन होणार. एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना UBT रस्त्यावर उतरणार. भाडेवाढीविरोधात निदर्शनं करून राज्य सरकारचा निषेध केला जाणार.