Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Jan 22, 2025, 12:09 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

22 Jan 2025, 12:07 वाजता

राज्यात हजारो कोटींचा पीकविमा घोटाळा - संजय राऊत

 

Sanjay Raut On Peekvima Ghotala : पी विमा घोटाळ्यावरुन खासदार संजय राऊतांनी आजी-माजी कृषिमंत्र्यांवर टीका केलीये.. राज्यात हजारो कोटींचा पीक विमा घोटाळा होतोय आणि कृषीमंत्री त्याचं समर्थन करतात असा टोला राऊतांनी लगावलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jan 2025, 11:56 वाजता

पुणे आणि नाशिकमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण

 

Tomato Rate : पुणे आणि नाशिकमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झालीये...बाजार समितीमध्ये टोमॅटोला 5 ते 7 रुपये किलोचा दर मिळतोय.. वाहतूक खर्चही निघत नसल्यानं टोमॅटो उत्पदाक शेतक-यांची चिंता वाढलीये.. मोठ्या कष्टानं पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jan 2025, 11:54 वाजता

5 दिवसांत सैफ अली खान फिट कसा? - संजय निरुपम

 

Sanjay Nirupan On Saif Ali Khan : सैफ अली खानच्या हल्ल्याबाबत शिवसेना नेते संजय निरुपम यांनीच सवाल उपस्थित केलेत.. सैफ अली खानच्या शरीरात चाकूचा तुकडा अडकला होता.. त्याच्यावर तब्बल 6 तास ऑपरेशन झालं.. मात्र 5 दिवसातच तो एवढा फिट कसा असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थीत केलाय. 

 

22 Jan 2025, 11:45 वाजता

EDसह तक्रारदाराला हायकोर्टाकडून 1लाख दंड

 

high Court On ED : मुंबईच्या मालाडमधील एका प्रकरणावरुन हायकोर्टाने EDला दणका दिलाय..एका विकासकाविरुद्ध खोटा फौजदारी खटला सुरु केल्याबद्दल कारवाई झालीय...ईडीसह तक्रारदाराला मुंबई हायकोर्टाकडून 1 लाखांचा दंड ठोठावलाय..यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे असं हायकोर्टाने म्हटलंय..

22 Jan 2025, 11:22 वाजता

संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

 

Sanjay Raut On Eknath Shinde : एकनाथ शिंदे देवेंद्र  फडणवीसांना नकोसे झालेत.. उद्या मोदींनाही नकोसे होतील असा दावा संजय राऊतांनी केलाय. अमित शाह आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा अवतार टिकेल असंही राऊत म्हणालेत.. एसटी महामंडलात 2 हजार कोटींचा घोटाला झाला असून याप्रकरणी भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही  राऊतांनी केलीये. 

22 Jan 2025, 10:33 वाजता

हल्लेखोराचा मास्क सैफच्या घरात सापडला-सूत्र

 

Saif Ali Khan Attack Update : अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीये.. पोलीस तपासामध्ये सैफच्या घरात हल्लेखोराचा मास्क पोलिसांना सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये..  हल्ल्याच्या दिवशी आरोपीनं हाच मास्क वापरला होता.. सैफच्या घरात आरोपीच्या बोटांचे ठसेही आढळून आले असून 19 ठिकाणी आरोपीच्या बोटांचे ठसे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आरोपीच्या मोबाईलमधूनही पोलिसांना महत्त्वाची माहिती सापडलीये.. आरोपीनं त्याच्या मोबाईलवरुन  बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्क साधला होता अशी माहितीही सूत्रांनी दिलीये..

22 Jan 2025, 10:28 वाजता

गोंदियात शेतक-यांचे 286 कोटी रुपयांचे चुकारे थकले

 

Gondia Farmer : गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या ५० हजारांवर शेतकऱ्यांचे २८६ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मार्केटिंग फेडरेशननेही थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार केलाय. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभाव केंद्रावरून धान खरेदी करते. फेडरेशनच्या १८३ धान खरेदी केंद्रावरून नोंदणी केलेल्या १ लाख ५० हजार २३४ शेतकऱ्यांपैकी ७४ हजार ३८ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ५३२ कोटी ५९ लाख रुपये असून  २८६ कोटी रुपयांचे चुकारे शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने रखडलेत. दोन महिन्यांपासून चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jan 2025, 09:51 वाजता

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवस ब्लॉक 

 

Mumbai-Pune Express Way Block : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर्स बसविण्यासाठी तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतोय.मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस हायवेवर पुणे लेनवर लोणावळा इथे डोंगरगाव/ कुसगांव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू करण्यात येतंय. त्यामुळे आजपासून  24 जानेवारीपर्यंत तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.  या ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ही जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून देहूरोड मार्गे वळवण्यात येणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jan 2025, 09:31 वाजता

सुनील तटकरेंचा शिवसेना आमदारांना सूचक इशारा

 

Raigad Sunil Tatkare : आयुष्यभर अशाच संघर्षाला तोंड देत मी काम करत आलो. माझ्यासाठी हे फार नवीन आहे अशातला भाग नाही. मात्र आपल्या राजकीय फायद्यासाठी गेल्या 20 वर्षात माझ्यावर ज्यांनी ज्यांनी निराधार आरोप केले त्यांचं पुढं राजकारणात काय झालंय ते सर्वांनी पाहिलंय. असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलाय. यावेळी त्यांचा रोख रायगडमधील शिवसेना आमदारांकडे होता. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यातच विधान सभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप शिवसेना आमदारांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर तटकरे बोलत होते....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jan 2025, 08:45 वाजता

अंजली दमानियांचे पोलिसांवर गंभीर आरोप

 

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत.. 3 जुलै 2024ला वाल्मिक कराडविरोधात FIR दाखल झाली होती मात्रा चार्जशीटमधून त्याचं नाव वगळण्यात आल्याचा दावा दमानियांनी केलाय.. या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी त्यांनी केलीये...  यासंदर्भात दमानियांनी ट्विट केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -