22 Jan 2025, 10:28 वाजता
गोंदियात शेतक-यांचे 286 कोटी रुपयांचे चुकारे थकले
Gondia Farmer : गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या ५० हजारांवर शेतकऱ्यांचे २८६ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मार्केटिंग फेडरेशननेही थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार केलाय. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमीभाव केंद्रावरून धान खरेदी करते. फेडरेशनच्या १८३ धान खरेदी केंद्रावरून नोंदणी केलेल्या १ लाख ५० हजार २३४ शेतकऱ्यांपैकी ७४ हजार ३८ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ५३२ कोटी ५९ लाख रुपये असून २८६ कोटी रुपयांचे चुकारे शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने रखडलेत. दोन महिन्यांपासून चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Jan 2025, 09:51 वाजता
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवस ब्लॉक
Mumbai-Pune Express Way Block : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर्स बसविण्यासाठी तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतोय.मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस हायवेवर पुणे लेनवर लोणावळा इथे डोंगरगाव/ कुसगांव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू करण्यात येतंय. त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ही जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून देहूरोड मार्गे वळवण्यात येणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Jan 2025, 09:31 वाजता
सुनील तटकरेंचा शिवसेना आमदारांना सूचक इशारा
Raigad Sunil Tatkare : आयुष्यभर अशाच संघर्षाला तोंड देत मी काम करत आलो. माझ्यासाठी हे फार नवीन आहे अशातला भाग नाही. मात्र आपल्या राजकीय फायद्यासाठी गेल्या 20 वर्षात माझ्यावर ज्यांनी ज्यांनी निराधार आरोप केले त्यांचं पुढं राजकारणात काय झालंय ते सर्वांनी पाहिलंय. असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलाय. यावेळी त्यांचा रोख रायगडमधील शिवसेना आमदारांकडे होता. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यातच विधान सभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप शिवसेना आमदारांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर तटकरे बोलत होते....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Jan 2025, 08:45 वाजता
अंजली दमानियांचे पोलिसांवर गंभीर आरोप
Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत.. 3 जुलै 2024ला वाल्मिक कराडविरोधात FIR दाखल झाली होती मात्रा चार्जशीटमधून त्याचं नाव वगळण्यात आल्याचा दावा दमानियांनी केलाय.. या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी त्यांनी केलीये... यासंदर्भात दमानियांनी ट्विट केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Jan 2025, 08:29 वाजता
सैफवरील हल्ल्याचं पुन्हा रिक्रिएशन
Saif Ali Khan Attack Update : सैफच्या मुंबईतल्या घरी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी हल्ल्याचं रिक्रिएशन केलं. काल रात्री मुंबई पोलिसांनी आरोपीला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरी आणलं होतं. आणि तो घरात कसा घुसला...हल्ला कसा केला, हल्ला करून कसा पळाला याची माहिती घेतली...सैफ अली खानला कालच लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांनंतर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी हल्ल्याचं रिक्रिएशन केलं. सैफच्या कुटुंबीयांनी आता सुरक्षेची विशेष काळजी घेतलीय. दुसरीकडे या प्रकरणाचे तपास अधिकारीही बदलण्यात आलेत. सुदर्शन गायकवाडऐवजी आता अजय लिंगनूरकर नवीन तपास अधिकारी नियुक्त करण्यात आलेत....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Jan 2025, 08:13 वाजता
वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करणार
Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर दाखल असलेल्या मकोका खटल्याची आज बीड न्यायालय मध्ये सुनावणी होणार आहे. 21 दिवसाची SIT कोठडी संपल्यानंतर आज वाल्मिक कराड याला पुढील सुनावणीसाठी बीड न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. काल सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींचा एकत्रित व्हिडिओ समोर आल्यानंतर आज होणाऱ्या या न्यायालयीन सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त प्राप्त झाल आहे. या व्हिडिओच्या अनुषंगाने आज न्यायालयात काही नवीन बाबी समोर येतात का याकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे. आजच्या सुनावणीनंतर वाल्मीक कराड याला एसआयटी कोठडी वाढून मिळते की त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याचा फैसला आज होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Jan 2025, 07:26 वाजता
ऑटो आणि पिकअपचा भीषण अपघात
Washim Accident : वाशिमच्या कारंजा तालुक्यात भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून 12जखमी झालेत.. कारंजा पोहा रोडवरील तुळजापूर धरणाजवळ ऑटो रिक्षा आणि पिकअप गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.. दुर्घटनेतील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना त्वरित उपचारासाठी कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.. हा अपघात एवढा भीषण होता यामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.अपघाताचे कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.