BCCI चा पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका! रोहित शर्मासंदर्भात मोठा निर्णय

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा जवळ येऊ लागल्यावर बीसीसीआयने रोहित शर्माबाबत निर्णय घेत पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका दिलाय. 

पुजा पवार | Updated: Jan 22, 2025, 01:26 PM IST
BCCI चा पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका! रोहित शर्मासंदर्भात मोठा निर्णय title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : 19  फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2025 (Champions Trophy 2025) ला सुरुवात होणार आहे. यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी ही हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार असून याचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे तर भारताचे सामने हे दुबईत खेळवले जातील. बीसीसीआयने (BCCI) आयसीसीला भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळणार नाही असे सांगितले होते त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जातं आहे. मात्र आता स्पर्धा जवळ येऊ लागल्यावर बीसीसीआयने रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) निर्णय घेत पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका दिलाय. 

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पाकिस्तानातील प्रमुख शहरात पार पडणार आहे. तसेच ट्रॉफीसोबत सर्व कर्णधारांचे फोटोशूट देखील पार पडेल. याकरता पीसीबीकडून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आमंत्रण देण्यात आले होते. मात्र या पत्रकार परिषद आणि फोटोशूटसाठी बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. 

टीम इंडिया जर्सीवर लिहणार नाही पाकिस्तानचं नाव : 

आयसीसीच्या स्पर्धांचे यजमानपद ज्या देशाकडे असते त्या देशाचे नाव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर लिहावे लागते. मात्र बीसीसीआय टीम इंडियाच्या जर्सीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान असणाऱ्या पाकिस्तानचं नाव लिहिणार नाही अशी माहिती समोर येत आहे. इत्यादी कारणांमुळे पीसीबीचे अधिकारी बीसीसीआयवर नाराज असून त्यांनी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावर खेळात राजकारण आणत असल्याचे आरोप केले आहेत. 

हेही वाचा : IND VS ENG : हार्दिक पंड्याशी तुझं जमतं का? टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव स्पष्टच बोलला, 'आम्ही...'

टीम इंडियाचे ग्रुप स्टेज सामने कधी? 

20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश - ठिकाण : दुबई 
23 फेब्रुवारी :  रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान - ठिकाण : दुबई 
2 मार्च  :  रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड - ठिकाण : दुबई 

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा