मोफत, मोफत, मोफत...! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी 'हे' तिकीट खरेदी करावे लागणार नाही

India vs England: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेला आज अर्थात 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 22, 2025, 10:10 AM IST
मोफत, मोफत, मोफत...! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी 'हे' तिकीट खरेदी करावे लागणार नाही title=

India vs England T20 Free Tickets:  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेला आज, 22 जानेवारीपासून कोलकातामध्ये सुरु होत आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. मात्र, लक्षात घ्या ही आनंदाची बातमी ईडन गार्डन्सवर होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी नसून चेन्नईत होणाऱ्या सामन्यासाठी आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा T20 सामना 25 जानेवारीला होणार आहे, या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये चुरस असणार आहे. याचे कारण असे की याची मोफत तिकिटं मिळणार आहेत. अलीकडेच चेन्नईतील क्रिकेट चाहत्यांसाठी मोफत तिकिटांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

तुम्हाला लागणार नाही 'हे' तिकीट खरेदी 

25 जानेवारीला चेन्नई येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यासाठी ही ऑफर आहे. यासाठी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (TNCA) सोमवारी क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये जाण्यासाठी कोणत्याही चाहत्याला मेट्रोचे तिकीट काढावे लागणार नाही. मात्र, ही मोफत सेवा फक्त त्या चाहत्यांसाठी आहे जे सामना पाहण्यासाठी चेपॉकला जाणार आहेत.

हे ही वाचा: 2 तास 37 मिनिटांचा 'तो' चित्रपट, ज्याने सर्व ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांवर फिरवले पाणी; याच्यापुढे 'महाराजा'ही झाला फेल

 

सामन्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद 

दुसऱ्या T20 सामन्याची तिकिटे आधीच विकली गेली आहेत याचमुळे चेपॉक शनिवार व रविवारच्या सामन्यासाठी खचाखच भरले जाण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी देखील, चाहत्यांनी IPL 2023 मध्ये सामन्यांच्या दिवसांमध्ये विनामूल्य मेट्रो सेवेचा आनंद घेतला होता.TNCA ने सोशल मीडिया पोस्टमध्ये जाहीर केले की, 'सामन्याचे तिकीटधारक परतीच्या आणि प्रवासाच्या दोन्ही प्रवासासाठी मोफत मेट्रो राईडचा लाभ घेऊ शकतात.'

हे ही वाचा: सिंगल पिलरवर उभा आहे 8 लेनचा रस्ता, अर्धा प्रवास जमिनीपासून 20 फूट उंचीवर तर बाकीचा जमिनीखाली; सर्वात छोटा एक्सप्रेस एखादा पाहाच

 

पहिला सामना कुठे होणार? 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना 22 जानेवारीपासून ईडन गार्डन्सवर सुरू होणार आहे. देशांतर्गत T20 सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा  आहे. थंडी असल्यामुळे दव लक्षात ठेवून टीम इंडियाने ओल्या चेंडूने सराव केला आहे. भारतीय संघाकडून, सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा आपल्या कर्णधारपदाची छाप सोडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.