Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
8 Nov 2024, 19:07 वाजता
मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी, महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा निषेध
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा निषेध केला आहे. सोबतच अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांशी कठोरपणे वागण्याचे दिले निर्देश.
सीईसी कुमार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिला नेत्यांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध केला. सोबतच चिंता व्यक्त केली की महिलांच्या प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी महिलांच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला विरोध करणारे असे कोणतेही कृत्य/कृती/उच्चार टाळावेत,असे आवाहन केले.
इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर वक्तव्य देवू नये सोबतच विरोधी उमेदवाराबाबत अपमान करण्यासाठी खालच्या पातळीवरील वैयक्तिक हल्ले करू नयेत असा सल्ला दिला.
8 Nov 2024, 18:21 वाजता
पूजा खेडकर प्रकरणात सुनावणी टळली
दिल्ली हायकोर्टातील सुनावणी टळली. पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन संदर्भात होणार होती सुनावणी. यापूर्वी दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिलं होतं. चीफ जस्टीस यांच्या निवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे सुनावणी होऊ शकली नसल्याची माहिती.
8 Nov 2024, 17:20 वाजता
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 8 पदाधिकाऱ्यांवर कारवाई
महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण 8 पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने 8 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं.
1) बापू भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष
2) कृष्णा अंधारे, जिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण
3) विश्वंभर पवार, जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर
4) श्रीमती पूजाताई व्यवहारे, महिला जिल्हाध्यक्ष नांदेड
5) ज्ञानेश्वर भामरे , माजी जिल्हा परिषद सदस्य
6) ममता शर्मा, दहिसर तालुकाध्यक्ष मुंबई
7) नरेंद्र तुरकर, तुमसर तालुकाध्यक्ष
8) आनंद सिंधीकर, युवक प्रदेश सचिव, नांदेड
8 Nov 2024, 16:22 वाजता
अमरावती देवेंद्र फडणवीस.....
- रवी भाऊंचा प्रचार करण्याची गरज नाही कारण त्यांचं कामच बोलते. ते जनतेच्या मनामध्ये आहेत, तिच्या नदीच्या मनामध्ये असतात त्यांनाच मतं मिळतात देवेंद्र फडणवीस यांची रवी राणांवर स्तुतीसूमने.
- महाराष्ट्रात अकरा लाख महिलांना लखपती दीदी केलं, येणाऱ्या काळात एक कोटी महिलांना लखपती दीदी करू.
- महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणायचे आहे.
- मुलीच्या जन्म झाला तर त्याचं स्वागत झालं पाहिजे.
- मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
8 Nov 2024, 15:15 वाजता
नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये भाषण -
काँग्रेस विकासात अडचण निर्माण करतं
आयटी पार्क नाशिकमध्ये रोजगार निर्माण करणारे
नाशिकमध्ये डिफेन्स व्यवसाय विकास करतोय
मिग सुखोई तयार करतोय याचा नाशिककरांना अभिमान आहे
काँग्रेसने डिफेन्स व्यवसाय वृद्धी थांबविण्याचा प्रयत्न करतेय
शेतकऱ्यांना मिळणारी 12 हजारांची मदत 15 हजार करणार
काँग्रेसने 75 वर्ष बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू करू दिले नाही
हे पाप काँग्रेसचे होते आर्टिकल 376 ची भिंत बांधून बाबासहेबाना काश्मीर मध्ये घुसू दिले नाही
मात्र आम्ही आर्टिकल रद करून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे
काँग्रेसने पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोंधळ सुरू केलाय
त्यांना पुन्हा बाबासाहेब यांचं संविधान आणि आरक्षण काढून घ्यायचे आहे
8 Nov 2024, 14:53 वाजता
'वाघाचं कातडं पांघरल्याने कोणी लांडगा वाघ होत नाही'
वाघाचं कातडं पांघरल्याने कोणी लांडगा वाघ होत नाही. योजना राबवण्यासाठी आणि पैसे आणण्यासाठी मनगटात बळ असावं लागतं. तानाजी सावंत यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नावं न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
8 Nov 2024, 14:46 वाजता
मराठवाड्याच्या हक्काचं 7 टीएमसी पाणी गुढीपाडव्याला सिना कोळेगाव धरणात पडणार म्हणजे पडणारच - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8 Nov 2024, 14:12 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News : साताऱ्यात अमित शाह यांची सभा होती. यावेळी त्यांनी अग्निविर आणि 370 कलम यावर वक्तव्य केलं. 'गेल्या वेळची चूक सुधारा आणि यावेळी अतुल भोसले यांना निवडून आणा. साताऱ्याच्या मातांना प्रणाम करतो कारण देश सेवेसाठी त्यांनी अनेक पुत्र दिले. 1 रँक 1 पेन्शन मोदी साहेबांनी दिलं, अग्निविर चांगले वीर घडवण्याचा प्रयत्न आहे. राहुल गांधींवर तुमचा सारखी खोटी आश्वासने नरेंद्र मोदींची नसतात. या पवित्र भूमीत येवून मला सांगायचे आहे की भाजपने जे संकल्प केले ते पूर्ण केले. अयोध्येत राममंदिर उभारून प्राण प्रतिष्ठान केली. 370 कलम हटविण्याचं काम केलं.'
8 Nov 2024, 13:45 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा सुरु होती त्यावेळी त्यांनी काही मुद्द्यांवर चर्चा केली आहे. निवडणूक लढवण्यापासून पर्यटनापर्यंत अनेक गोष्टींवर त्यांनी वक्तव्य केलं. राज ठाकरे म्हणाले, "किती वर्ष त्याच विषयावर निवडणूक लढवणार, निवडून दिलेल्या माणसाला प्रश्न विचारला पाहिजे. नुसत्या टुरिझम वर हे तीन जिल्हे महाराष्ट्र पोसू शकतात. एका पर्यटन या विषयावर गोवा सुरु आहे. तर खासदार दिल्लीत जाऊन काय करतात? राजकारणी फक्त गुंतलेत पक्ष फोडाफोडीचे राजकारणात, पत्रकारांची धार बोठट झालेली आहे. एक काळ होता जेव्हा पत्रकारांना राजकारणी घाबरायचे."
8 Nov 2024, 13:13 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: स्वतःऱ्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचे गांधींनी ठरवले होते, कारण त्यांना माहित होतं की हे पुढे चालणार नाही. जम्मू कश्मीरमधे काँग्रेसच्या शासनात संविधान लागू नव्हते, एक संविधान लागू करण्याचे काम भाजपणे केलं. आर्टिकल 370 काँग्रेसनं निर्मण केलेली समस्या भाजपानं सोडवली, लक्षात ठेवा काँग्रेस सहयोगी पक्षांसोबत सत्तेत आल्यावर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा आर्टिकल 370 लागू करण्याचे कामं केलं. काश्मीर तोडण्याचे कामं करीत आहे, भाजप आमदारांनी याला विरोध केला तर त्यांना सभागृहाबाहेर काढून टाकण्यात आलं.