कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव केला आहे. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही उमेदवार आमने-सामने उभे आल्याने ही लढत चुरशीची होईल असे वाटले होते. पण सकाळपासून येत असलेले कल पाहता संजय मंडलिक हे उजवे ठरताना दिसत होते. कोल्हापूर मतदार संघात बहुजन वंचित आघाडीने अरुणा माळी यांना उमेदवारी दिली होती. पण राज्यात कुठेही वंचित आघाडीचा फॅक्टर जाणवला नाही.
1.00-संजय मंडलिक 1 लाख 19 हजार 935 मतांनी आघाडीवर, धनंजय महाडीकांची पिछेहाट
12.00- संजय मंडलिक 88 हजार मतांनी आघाडीवर, धनंजय महाडीकांची पिछेहाट
10.44 मि- शिवसेनेचे संजय मंडलिक हे सहाव्या फेरी अखेर 81 हजार 924 मताने आघाडीवर.
राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक मोठ्या फरकाने पिछाडीवर
10.09 मि- कोल्हापुरात संजय मंडलिक 60 हजार मतांनी आघाडीवर
9.45 am - पहिल्या फेरीत सेनेच्या संजय मंडलिक यांना 41223 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे महाडिक यांना 21333 मते मिळाली..पहिल्या फेरीत एकूण 68 हजार मतमोजणी झाली.....
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
धनंजय महाडिक | राष्ट्रवादी | 607665 |
संजय मंडलिक | शिवसेना | 574406 |
संपतराव पवार पाटील | शेतकरी कामगाप पक्ष | 13162 |
संदिप सकपाळ | अपक्ष | 10963 |
नवनाथ पाटील | बसपा | 9291 |
धनंजय महाडिक यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ३३,५४२ मतांनी पराभव केला होता.