जुनी जखम, नवं राजकारण! शरद पवार, छगन भुजबळ आणि मुख्यमंत्रीपद; 2004 ची 'ती' घटना पुन्हा चर्चेत

Sharad Pawar and Chhagan Bhujbal: छगन भुजबळ 2004 साली मुख्यमंत्री होणार होते का? तसा सवाल आता उपस्थित होत आहे. शरद पवारांनी केलेलं एक विधान त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे. काय म्हणाले शरद पवार आणि त्याचे वेगवेगळे अर्थ कसे काढले जाताहेत पाहुयात या खास रिपोर्टमधून..   

शिवराज यादव | Updated: Nov 12, 2024, 08:28 PM IST
जुनी जखम, नवं राजकारण! शरद पवार, छगन भुजबळ आणि मुख्यमंत्रीपद; 2004 ची 'ती' घटना पुन्हा चर्चेत title=

Sharad Pawar and Chhagan Bhujbal: छगन भुजबळ 2004 साली मुख्यमंत्री होणार होते का? तसा सवाल आता उपस्थित होत आहे. शरद पवारांनी केलेलं एक विधान त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे. काय म्हणाले शरद पवार आणि त्याचे वेगवेगळे अर्थ कसे काढले जाताहेत पाहुयात या खास रिपोर्टमधून.. 

2004 मध्ये सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादीकडं मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही असा सवाल उपस्थित केला होता. शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्रिपद न देऊन एकप्रकारे अन्याय केल्याचा आरोप अजित पवारांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत केला होता.

अजित पवारांनी केलेल्या आरोपांना शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद सहज मिळालं असतं असं सांगितलं आहे. पण भुजबळांना मुख्यमंत्रिपदी नेमणं योग्य वाटलं नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

2004 मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यात आलं.  त्यावेळी राष्ट्रवादीत सर्वात वरिष्ठ म्हणून भुजबळांचं नाव होतं. मात्र त्यानंतर भुजबळांचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरूंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असं शरद पवारांनी म्हटलं आहे. 

2004 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत 71 जागा मिळाल्या होत्या
तर काँग्रेसला 69 जागा मिळल्या होत्या.
शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागांवर यश मिळालं होतं 
शरद पवारांच्या या दाव्यावर भुजबळांनीही आपली बाजू मांडली आहे

शरद पवारांनी या मुलाखतीतून अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलंच आहे. शिवाय  मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता त्यावेळी भुजबळांकडे नव्हती असंही सूचवललं आहे. शरद पवारांनी एकाच दोन दगडात दोन पक्षी तर मारले नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.