Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडत आहे. या अर्थसंकल्पात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात सुरू करण्यात येईल. तसेच यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींच्या जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहे. तसेच पहिलीत 4000 रुपये तर सहावीत 6000 रुपये, अकरावीत 8000 रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येईल.
तसेच महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास तिकीट सरसकट 50 टक्के सुट देण्याची घोषणा केली आहे. तसेच महिला खरेदीदाराला घर खरेदी करताना 1 टक्का सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरूष खरेदीदाराला घराची विक्री करता येत नाही. दरम्यान ही अट शिथील करून इतर सवलती देण्यात येणार आहे.