सांगली : 2015 मध्ये भानुदास बाबुराव भोसले इचलकरंजी येथील पुलावरून मोटर सायकलवरून चालले होते. त्यांचा पुतण्या गाडी चालवत होता तर भानुदास भोसले पाठीमागे बसले होते. पाठीमागून येणार्या कर्नाटक बसने पाठीमागून टक्कर दिली. या अपघातात भानुदास भोसले यांचा जागीच मृत्यू झाला होता तर पुतण्या गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी भानुदास भोसले यांच्या पत्नी विजया भोसले यांनी सांगली येथील न्यायालयामध्ये ऍड.आर.एम.भाले यांच्यामार्फत नुकसान भरपाईसाठी दावा केला होता. न्यायालयाने यावेळी विजया भोसले यांना कर्नाटक एसटी महामंडळाने भरपाईपोटी 8 लाख 33 हजार 563 रुपये देण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने आदेश देऊनही अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 9 लाखांची नुकसान भरपाई न दिल्याबद्दल सांगली येथील न्यायालयाने कर्नाटकची एसटी बस जप्त केली आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. एम. पाटील यांनी हा आदेश दिला होता. न्यायालयाचे हेड बेलीफ मुकुंद काटकर, आप्पासाहेब भोसले आणि फिरोजखान शेख यांनी ही बस जप्त केली.