Bullock Cart Race in Maharashtra: बैलगाडा (bailgada sharyat) शर्यतीची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या (pune) आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथे मुक्तादेवीच्या (muktadevi) यात्रा उत्सव निमित्त चार दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचे (bailgada) आयोजन करण्यात आले असून या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालकांसह शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लंबी रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुणे (pune) जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर बैलगाडा घाटात आता भीर्रर्रर्रर्र चा नाद घुमू लागला आहे. (maharashtra news bullock cart competition will commenced for four days in Ambegaon Khadki)
ग्रामीण महाराष्ट्रात अनेक वर्षांनंतर बैलगाडा शर्यत पुन्हा झाली. शर्यतीच्या बैलांना पुन्हा लाखोंचा भाव आला होता. शर्यतीसाठी दणकट असणाऱ्या बैलांच्या खरेदी-विक्रीचाही (baigada sharyant in february) धुरळा उडू लागला होता. त्यात डुंबरवाडी गावच्या प्रमोद डुंबरेंच्या बजरंगी नावाच्या बैलानं तर कहरच केला होता. शर्यतीत पहिला आलेल्या बजरंगीनं खरेदीच्या बोलीतही पहिला नंबर पटकावला होता. बजरंगीला (bajrangi) चक्क फॉच्यूर्नरपेक्षाही (fortune) अधिक किंमत मिळाली होती. बजरंगी दिसायला डौलदार. पांढऱ्या रंगाचा चपळ बजरंगी शर्यती गाजवतो. म्हणूनच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीच्या किशोर दांगट आणि बबन दांगट या शेतकरी भावंडांनी तब्बल 25 लाख रुपये त्याच्यासाठी मोजलेत. दांगट बंधूंना लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीची आवड. हौसेला मोल नसतं म्हणूनच त्यांनी आपल्या घरच्या पिंट्या बैलाला बंजरंगीची (bajirangi) जोड दिली. शर्यती सरू झाल्यामुळे बैलांना सोन्याचा भाव (gold price) आला होता. बैलांच्या किमती पुढच्या काळात वाढत्याच राहणार असल्याचं बैलगाडा मालकांचं म्हणणं होतं. बैलगाडा शर्यतीमुळे भीर्रर्रचा नाद तर घुमू लागलाच पण बजरंगीसारख्या डौलदार बैलांना महागड्या गाड्यांएवढी किंमत मिळू लागली आहे.
हेही वाचा - Weather News: राज्यात पारा घसरुन 9.5 अंशांवर; जाणून घ्या हिवाळी सहलीसाठीची सर्वोत्तम जागा
डिसेंबर महिन्यात बैलगाडा शर्यंतीवरून मोठा गदारोळ झाला होता. या महिन्यात महाराष्ट्र राज्यात बैलगाडा शर्यत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. काही अटींसह शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) परवानगी दिली. बैलगाडा शर्यतीत कोणती काळजी घ्यावी आणि जबाबदारी कोणाची असेल या अटींसह बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला. इतर दोन राज्यांत बैलगाडा शर्यत (baligada) सुरू आहे मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. घटनापीठाने इतर राज्यांना परवानगी दिली. मग महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. बैलगाडा शर्यतीबाबत (bailgada) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.
गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्यातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी (permission) दिली. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयात बैल धावू शकत नाही यांवर युक्तीवाद झाला. बैलाला धावण्याची गरज असते. बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे खिलारी बैल बसून आहेत. त्यामुळे खिलारी जातीच्या बैलाचे नुकसान होत आहे असे यावेळी सांगण्यात आले होते. दरम्यान 2019 मध्ये झालेल्या पशुगणनेत शर्यत बंदी मुळे राज्यातील खिलार देशी गाईची (desi cow) संख्या 45 टक्के कमी झाल्याचे दिसून आले आहे.