ठाणे : Thane Daighar Building Collapsed : ठाण्याच्या डायघरमधील पाच मजली इमारतीचा भाग मध्य रात्री कोसळला. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. रस्ता रुंदीकरणासाठी ही इमारत रिकामी करण्यात आली होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अग्निशमन दल आणि ठाणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची तुकडी घटनास्थळावर दाखल झाली आहे. ही बिल्डींग एका बाजूला झुकल्याचंही दिसून येत आहे.
ठाण्याच्या डायघरमधील पाच मजली इमारतीचा भाग रात्री कोसळला #Thane #buildingcollapse pic.twitter.com/WlkaVEHqaq
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 13, 2022
ठाणे महापालिका हद्दीतील कल्याण शीळ रोडवरील कल्याण फाटा येथे एका पाच मजली इमारतीचा काही भाग रात्री कोसळला. या इमारतीत 15 कुटुंब रहात असल्याची माहिती समोर आली आहे. तसा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र, याबाबत कोणीही काही बोलण्यास नकार देत आहेत. दरम्यान, या परिसरात जवळच असलेल्या लकी कंपाऊडमध्ये काही वर्षांपूर्वी इमारत पडून काही लोकांचा मृत्यू झाला होता. याची या दुर्घटनेनंतर पुन्हा आठवण झाली.
दरम्यान, दिवा, शीळ, पडले या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असून ठाणे महापालिका याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महापालिकेला वारंवार कळवून सुद्धा शीळ आणि दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.