Amol Mitkari MNS Controvercy : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अकोल्यातील मनसे सैनिक चांगलेच संतापले. अकोला शहरातील विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असता मनसे सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसे सैनिकांची बाचाबाची झाली. यावेळी पूर्णतः तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. अमोल मिटकरी विरोधात मनसे सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्यानंतर मनसे सैनिकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेली हीच टीका मनसेच्या जिव्हारी लागली. अकोला शहरातील विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसैनिकांची बाचाबाचीही झाली.
मनसे आणि राष्ट्रवादीच्या या वादाची ठिणगी पडली ती राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यावेळी.. पुण्यातील पुरावरून राज ठाकरेंनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर दहा वर्षांपूर्वीच्या वक्तव्याचा दाखला देत खास ठाकरी शैलीत टोला लगावला होता. त्यावर सुपारीबहाद्दर म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंना अंगावर घेतलं होतं. मिटकरींच्या टीकेमुळं मनसैनिक संतापले. हिंमत असेल तर अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि 2 आमदार निवडून आणावेत असं आव्हान मनसे नेत्यांनी मिटकरींना दिलं.
मनसेनंही मिटकरींवर निशाणा साधलाय. हिंमत असेल तर अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि 2 आमदार निवडून आणावेत असं आव्हान गजानन काळेंनी मिटकरींना दिलंय. तर अजित पवारांमुळे मिटकरींना विधानपरिषदेची जागा मिळाली. त्यामुळे त्यांना बोलावं लागत असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलीय.
दरम्यान, या वादामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसेमध्ये राजकीय तणाव वाढल्याचं पाहायला मिळतंय. मनसेच्या या खळखट्याकमुळे आगामी काळात दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.