Maratha Reseravtion : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर किर्तनकार अजय बारसकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील हेकेखोर असल्याचे म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी संत तुकाराम यांचा अवमान केला असल्याचाही आरोप बारसकर यांनी केला. तसेच मागच्या दोन महिन्यापासून त्यांनी बंद दाराआड बैठका घेण्यास सुरुवात केल्याचेही बारसकर यांनी म्हटलं आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अजय बारसकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
"अजय बारसकर यांच्या नावाने 300 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. 40, 50 महंत आले होते तेव्हा त्यांचा सन्मान राखला. म्हणजे मी वारकरी धर्माला मानतो. तुम्ही रॅलीमध्ये चालणार होतात पण अर्ध्यात फसवूण कुठे गेलात. ते संत तुकाराम महाराजांचे आदेश घेऊन आलो म्हणाले. मी म्हटलं तू मला शिकवू नको स्टेजच्या खाली जा. छत्रपती आणि तुकाराम महाजांपेक्षा आम्हाला मोठं कोण आहे. उपोषणामध्ये माणूस बोलून जातो. उपोषण सुटल्यानंतर पश्चाताच सुद्धा व्यक्त करेन. तू सरकारच्या आडून वचवच बंद कर. माझ्या कुटुंबाबद्दल बोलला तर तुला सोप्प जाणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बारसकर यांना दिला.
"मागासवर्ग आयोग गठीत करायला मी लावला. मी नाव ठेवण्यासारखं काय केलं. तू महिलांवर बलात्कार करतो असे तुझ्या गावचे लोक सांगतात. ज्याला कुणी मोजत नाही त्याला सरकारचा पाठिंबा आहे. मंत्री होण्याचं त्याचे स्वप्न आहे. ज्या बड्या नेत्यांमुळे महिलेवर अन्याय झाला आहे तिने आमच्याकडे यावं आम्ही न्याय देऊ. तुकाराम महाराजांच्या नावाखाली याला सहानुभूती घेऊन मरायचं आहे. मला महाराज मंडळींचा आशीर्वाद आहे.10 वर्षात महाराजांना शिव्या दिल्या तेव्हा तू कुठे होता," असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
"तू कधी तुकाराम महाराज यांच्या बद्दल बोलला तर याद राख. माझ्याकडे चेन्नईच्या महिला तक्रार घेऊन येणार आहे. याच्यामुळे तुमचे पक्ष अडचणीत येतील. तू संत महंत यांचं ज्ञान आम्हाला शिकवू नको. तू महाराज म्हणून मोठं होण्यासाठी मला पाणी पाजायला आला होता का.? संजय राऊत आणि माझा काय संबंध आहे. मी जातीसाठी बोलतो. हे सगळं नियोजित आहे. तुला मुंबईचा मीडिया एका घंट्यात कसा मिळाला? बारसकर याने महाराज नावाला डाग लावू नये," असेही जरांगे पाटील म्हणाले.
"तू सरकारची सुपारी घेऊन बोलू नको. तुकाराम महाराज यांच्या बद्दल तू बोलू नको. तू माझ्या कुटुंबाची सर करू नको. तुला स्वतःची आई बहीण कळते का. याला बच्चू कडूला देखील संपवायचं आहे. हा सरकारला डाग लावत आहे. ट्रॅप रचायला मी केलंय काय.या नालायक महाराजाला सरकारने हाताशी धरलंय. याचा कशाशी सुद्धा संबंध नाही. बच्चू कडूंनी एवढ्या नालायक महाराजाला हाताशी धरलं कसं काय मी बोलण्या इतपत तुझी लायकी आहे का," असे जरांगे पाटील म्हणाले.
"सरकारने लावलेल्या ट्रॅपमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक प्रवक्ता आणि देवेंद्रे फडणवीस यांचाही एक मोठा नेता आहे. सरकारचं माझ्या तब्येतीकडे लक्ष नाही. यांचं म्हणणं आहे 10 टक्के दिलेलं आरक्षण आम्ही घ्यावं. पण लोक हे आरक्षण घ्यायला तयार नाही,म्हणून ट्रॅप लावला आहे. याचाच एक भाग म्हणून हा महाराज सरकारने हाताशी धरला आहे. बारकरांनी तुकाराम महाराजांच्या आडून बोलणं बंद करावं आणि माझया कुटुंबाबद्दल बोलू नये. या दोन गोष्टी तुला सोडव्या लागतील. सरकारची याने सुपारी घेतल्यानं याला माझ्या विरोधात बोलावंच लागेल. तुला मराठे आता पायाखाली तुडवतील. तू ज्या पोरांबद्दल माझ्यावर आरोप केले ते सगळे रात्री मला भेटून गेले. मीच त्या पोरांना सांगितलं याला सोडून द्या," असे मनोज जरांगेंनी म्हटलं.