अमरावती : Amravati member of Parliament Navneet Kaur Rana : खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच हिसका दाखवला आहे. अमरावतीतील शाईफेक प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर राज्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस आयुक्तांनी खासदारावर गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोप राणा यांनी केला होता. त्याप्रकरणी 6 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. अमरावती आणि मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालकांना ही नोटीस देण्यात आली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. नवनीत राणा यांच्या हक्कभंग नोटीशीनंतर राज्यातील पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. अमरावती आणि मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच पोलीस महासंचालकांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
6 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राणा दाम्पत्याला स्थानबद्ध करणे पोलीस आयुक्त आरती सिंह यांना भोवले आहे. यापूर्वी एकदा पोलीस आयुक्त आरती सिंह दिल्ली येथे हजर झाल्या होत्या.