झी मराठीवरील 'बस बाई बस' या अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. सेलिब्रिटींपासून विविध महिला राजकारणाऱ्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होतात.
या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis),खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) सहभागी झाल्या आहेत. नुकतीच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती. याचा प्रोमो सध्या ट्विट करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये सुबोध भावे एखादे गाणं लावतात आणि किशोरी पेडणेकर यांना त्याच्याशी संबधित व्यक्तीचे नाव घ्यायला सांगतात. दरम्यान,यावेळी पहिलं गाणं कोण होतीस तू काय झालीस तू हे लावण्यात येतं. त्यावेळी किशोरी पेडणेकर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे नाव घेतात. त्यानंतर जाने कहा गये वो दिन हे गाणं लावण्यात आलं. त्यावर पेडणेकरांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नाव घेतले.
त्यानंतर दोस्त दोस्त ना रहा हे गाणं वाजवण्यात आलं. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेतले. चौथे गाणे हे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे लावण्यात आलं. यावर उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं नाव घेतलं. नाना पटोले कोणतं ओझं घेत नाहीत असेही पेडणेकर म्हणाल्या.
किशोरी ताईंनी दिलेल्या मजेशीर उत्तरांना तुम्ही सहमत आहात का?
'बस बाई बस'
शुक्र - शनि, रात्री ९.३० वा. #BusBaiBus #ZeeMarathi pic.twitter.com/cQqMaHgVrb— Zee Marathi (@zeemarathi) August 26, 2022
दिस जातील दिस येतील हे गाणं लावल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव घेतले. त्यानंतर क्या हुआ तेरा वादा हे गाणं वाजवण्यात आलं आणि माजी महापौरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले.
दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी झी मराठीवर हा रात्री 9.30 वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.