BMC Rats kill: उंदीर मारण्यासाठी लागणारा खर्च हा दरवेळेस चर्चेचा विषय बनतो. उंदीर मारणे ही तशी दिसायला सोप्पी गोष्ट वाटू शकते. पण प्रत्यक्षात यासाठी खूपच खर्च येत असल्याचे दिसून आले आहे. मुंबई पालिकेकडून यासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला आहे. उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेची कोटींची उड्डाणे पाहायला मिळत आहेत.
मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यासाठी चार महिन्यांत केले सव्वा चार कोटी रूपये खर्च केले आहेत. विधानपरिषदेत राज्य सरकारने लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
बीएमसीने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात १ लाख ८५ हजार २७० उंदीर मारल्याची माहिती. यापैकी १ लाख ५८ हजार ९०९ उंदीर हे कंत्राटदारांमार्फत मारण्यात आले.
यासाठी प्रत्येक उंदरामागे २३ रुपये प्रमाणे ४ कोटी २६ लाख १ हजार २१० रुपये खर्च करण्यात आले आहेत.
१,८५,२७० पैकी १,५८,९०९ उंदीर कंत्राटदारांनी मारले तर अन्य पालिका कर्मचाऱ्यांनी मारल्याची माहिती सरकारने दिली आहे.