Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?

Mumbai–Nagpur Expressway : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्या लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. पण या महामार्गावरील एक टोल सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही या टोलबद्दल ऐकलं आहे का? 

Updated: Dec 7, 2022, 11:49 AM IST
Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?  title=
Mumbai Nagpur Expressway Why Waifal toll on Samriddhi Highway being discussed on Social media nmp

Samruddhi Mahamarg Toll : समृद्धी महामार्गाची (Samruddhi Mahamarg) पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गाडीचं स्टिअरिंग (Car steering) आपल्याकडे घेतलं होतं. त्यानंतर जोरदार चर्चा रंगली होती. दुसरीकडे आता नागपूर - मुंबईचं अंतर काही तासांवर येणार आहे. त्यामुळे या महामार्गाची सर्वसामान्य उत्सुकतेने वाट पाहतं होते. अखेर हा महामार्गावरील पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी  11 डिसेंबरला सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  पण हा महामार्ग राहिला बाजूला यावरील एका टोलनाक्याची सोशल मीडियावर 'वायफळ' चर्चा रंगली आहे. 

नावातच सगळं काही!

महामार्ग म्हटला की टोल आलाच...मग समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी दरम्यान 19 टोल नाके येणार आहेत. नागपूर ते शिर्डी (nagpur to shirdi) पर्यंतच्या 520 km अंतराकरता चारचाकी वाहनांना 900 रुपये टोलदर द्यावा लागणार आहे. पण या टोलनाक्यावर येणारा एका टोल नाक्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. या टोलनाक्याबद्दल विदर्भातील अनेकांना माहिती असेल पण या टोलची अशी पण 'वायफळ' (Waifal) चर्चा होईल असा कोणी विचारही केला नसेल. (Mumbai Nagpur Expressway Why Waifal toll on Samruddhi Highway being discussed on Social media)

'वायफळ' चर्चा !

समृद्धी महामार्गावरील नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर हिंगणा परिसरातील वायफळ हा टोल नाका प्रसिद्धीझोतात आला आहे. कारण वायफळ टोलनाक्यावरच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्ग लोकापर्णाचा शानदार कार्यक्रम करण्यात येणार आहे. हा टोलनाका या महामार्गावरील पहिला टोलनाका आहे.  पण हा महामार्ग आणि लोकापर्ण कार्यक्रम राहिला बाजूला या टोलच्या नावावरुन नेटकरी ट्रोल करत आहेत. वायफळ असं या टोलचं नाव आणि आताच अजून एक भर म्हणजे या टोलची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल

 

वायफळ हा शब्द आपण रोजच्या जीवनात वायफळ गप्पा, वायफळ गोष्टी अशाप्रकारे करतो. वायफळ म्हणजे व्यर्थ, वाया जाणारं , आणि निरर्थक बोलणे करणारा व्यक्ती याला म्हणतात. त्यातच महिला या कायम वायफळ गोष्टी करतात असा काहीसा पुरुषांचा समज असतो. त्यामुळे वायफळ टोल नाक्याची जबाबदारी महिलांकडे...असं नेटकरी ऐकून त्यांना हसू आवरतं नाही आहे. 

असो...समृद्धी महामार्गावर नागपूरमधील वायफळ टोल नाका महिला ऑपरेट करणार आहेत. या टोल नाक्यावरील सर्व काउंटरवरची जबाबदारी महिलांकडे सोपवण्यात आली आहे. त्यासाठी महिला कर्मचा-यांना खास प्रशिक्षण देण्यात आलंय. 

पाहा व्हिडिओ (Video)

पंतप्रधान मोदी यांचा 11 डिसेंबरचा कार्यक्रम 

11 डिसेंबरला सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींचं नागपूर विमानतळावर आगमन
नागपूर विमानतळ मेट्रोच्या स्थानकावर त्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण
त्यानंतर मोदी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी रवाना होणार
गडकरींचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट फुटाळा तलावाचंही मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता
पण कार्यक्रम पत्रिकेत या सोहळ्याचा समावेश नसल्याने साशंकता

'समृद्धी'ची वैशिष्ट्ये

मुंबई ते नागपूर 8 तासांत अंतर पार करण्याचं उदिष्ट
701 किमी लांबीचा महामार्ग
महामार्गासाठी 55 हजार कोटी रुपये खर्च
10  जिल्ह्यांमधील 390 गावांना जोडणारा महामार्ग