अनसक्सेसफुल लाईफला कंटाळलोय! घरच्यांसाठी चिठ्ठी लिहित पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं

भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या युवा वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या  (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. 

Updated: Apr 18, 2023, 03:27 PM IST
अनसक्सेसफुल लाईफला कंटाळलोय!  घरच्यांसाठी चिठ्ठी लिहित पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या युवा वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या  (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. 

पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं
अनसक्सेसफुल लाईफचा कंटाळा आलाय असं लिहित एका पदवीधर तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा इथं घडली आहे. इंदिरा नगर भागात राहणारा 23 वर्षीय प्रशांत ढवळे या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. पदवीधर असलेला प्रशांत एका खाजगी रुग्णालयात काम करायचा. रविवारी रात्री तो आपल्या खोलीत झोपायला गेला पण सोमवारी सकाळी उशिरा पर्यंत उठला नसल्याने कुटुंबीयांनी त्याला आवाज दिला. कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने दारातून पाहिले असता छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रशांत दिसला. 

सूसाईड नोटमध्ये व्यक्त केल्या भावना
खोलीत एक सूसाइड नोट आढळली. मला माफ करा, मी सर्वांना सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय, मी कोणत्याही मुलीशी अजिबात प्रेम करत नाही मी एव्हढा मोठा निर्णय घेण्याचे कारण की मी माझ्या अनसक्सेसफुल लाईफ ला कंटाळलोय. मला जगण्याचे कोणतेच कारण दिसत नाही. कोणतेच ध्येय समोर नाही. अण्णा आईची काळजी घ्या असे भावनिक शब्द प्रशांतने सुसाईड नोट मध्ये लिहिलं आहे. माझ्यावर कुणाचेही दडपण नाही. मलाच जगण्याचा खूप कंटाळा आलाय, जगण्याची थोडीही इच्छा किंवा आवड मनामध्ये उरली नाही. उगीच कुणावर आरोप करून कुणाला त्रास देऊ नका, नातेवाइकांना विनंती करतो काळजी घ्या असे -हुदय पिळवटून टाकणारे शब्द प्रशांत ने सूसाईड नोट मध्ये लिहिले आहेत. 

पदवीधर तरुणाने अश्या प्रकारे आत्महत्या केल्याने लोहा शहरात खळबळ उडाली आहे. लोहा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांची आत्महत्या
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या चारही तरुणांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलह ही कारणं समोर आली. कोरोना काळानंतर तरुणांमध्ये आत्महत्या तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: 31 ते 50 वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहेत. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक होती.