काळजाचा थरकाप उडवणारा Video; वळूने वृद्धाला जमिनीवर आपटलं आणि...

मोकाट असलेल्या जनावरांमुळे तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

Updated: May 29, 2022, 09:52 AM IST
काळजाचा थरकाप उडवणारा Video; वळूने वृद्धाला जमिनीवर आपटलं आणि...

नाशिक : नाशिकच्या सातपूरमधून एक धक्कादायक व्हिडीयो समोर आला आहे. मोकाट असलेल्या जनावरांमुळे तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. नुकतंच  इथल्या भाजी मार्केटमध्ये एका जेष्ठ व्यक्तीवर वळूने हल्ला केल्याचा व्हिडीयो समोर आलाय.

नाशिकमध्ये नागरिकांना मोकाट जनावरांचा त्रास सहन सरावा लागतोय. दरम्यान आता एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर वळूने हल्ल्या केल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर या वृद्धाला पाठीमागून बैलाने आपल्या शिंगावर उचलले आणि मग फेकून दिलं.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बाजारात असलेल्या दुकांनांमध्ये असलेल्या कॅमेरात हा व्हिडीयो कैद झाला. या सीसीटीव्हीत दिसतंय की, नागरिक बाजारात खरेदीसाठी आलेले आहेत. यावेळी एक वयोवृद्ध रस्त्यावरुन चालत असताना मागून येणाऱ्या वळूने त्या वृद्धाला शिंगावर घेतलं आणि खाली जोरात आपटलं.

सुदैवाने ज्येष्ठ नागरिक असलेल्या या व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, या जनावरांच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी त्यांचा बंदोबस्त तात्काळ करण्याची मागणी केलीये.