भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात; एकावेळी उभी राहतील 350 विमाने

 Navi Mumbai International Airport : आपल्या महाराष्ट्रात भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ निर्माण होत आहे. लवकरच हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल हणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 28, 2024, 08:10 PM IST
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात; एकावेळी  उभी राहतील 350 विमाने title=

International Airport In Navi Mumbai: भारतामध्ये एकूण 137 विमानतळ आहेत. ​हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे. सुमारे 5945 एकरवर हे विमानतळ बांधले आहे.​  भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात उभारले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे (Navi Mumbai International Airport - NMIA)  भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. 

हे देखील वाचा... 23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य, नाव ऐकून शॉक व्हाल, 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील एकमेव विमानतळ आहे. या विमातळावर वाहतुकीचा मोठा ताण येत आहे.  मुंबईला लवकरच दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात समाविष्ट असलेले नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळपास पूर्णत्वास आले आहे.  लवकरच येथे व्यावसायिक उड्डाणांची चाचणीही घेतली जाणार आहे.

हे देखील वाचा...  जगातील एकमेव फळ 'जे' विमानात नेता येत नाही; 99 टक्के उत्तर माहित नाही

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे  सर्व टर्मिनल भूमिगत मेट्रोने जोडले जाणार आहेत. मेट्रोची थेट कनेक्टिव्हिची असलेले हे  भारतातील पहिले विमानतळ असणार आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी जवळपास प्रत्येक मोडमध्ये वाहतुकीची सुविधा उपलब्ध असेल, ज्यामध्ये प्रवासी मेट्रो, बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे आणि अटल सेतूच्या माध्यमातून विमानतळावर पोहोचता येणार आहे.  सध्या या विमानतळाचे  काम वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. 31 डिसेंबरला या विमानतळावर व्यावसायिक उड्डाण चाचणी घेतली जाणार आहे. एप्रिल 2025 पासून येथे नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी 3.7 किमी लांब इतकी आहे. या विमानतळावर  एकाच वेळी 350 विमाने उभी राहू शकतील. तसेच येथे 76 खाजगी विमाने उभी राहू शकतात. या विमानतळावर देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील तयार केली जाणार आहे. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल. देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील तयार केली जाणार आहे.