अमर काणे, झी २४ तास, नागपूर : नागपूर शहरात कोरोना संदर्भात जे आकडे समोर येत आहेत, ते पाहता पुन्हा कडक निर्बंध लावण्याची गरज निर्माण झाली आहे, असं नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितिन राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच नितिन राऊत यांनी असं देखील म्हटलंय की, नागपूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेने पाऊल जिल्ह्यात टाकले आहे.
महत्त्वाचं म्हणजे 78 नमुने जिनोम सिक्वेन्सीसाठी पाठवले आहे. नागपूर शहरात कसे निर्बंध लावले जातील , याचा अंतर्गत आढावा देखील प्रशासनाकडून घेतला गेल्याचं दिसून येत आहे.
तिसऱ्या लाटेने जिल्ह्यात पदार्पण केले असल्याने हे निर्बंध लावावे लागणार आहे.. येत्या दोन ते तीन दिवस विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर हे निर्बंध अंमलात येतील. साधारणपणे तीन दिवसानंतर हे निर्बंध अमलात आणले जातील, असं नागपूरचे पालकमंत्री नितिन राऊत यांनी म्हटलं आहे.
हॉटेल 10 ऐवजी रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार, दुकानं 8 ऐवजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार, तर बाजार weekend ला ( शनिवारी, रविवारी ) बंद असणार आहेत.
पालकमंत्री नितिन राऊत दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून आम्ही हे पाऊल उचलत आहोत. जेव्हा कोरोना बाधित संख्या वाढू लागते, तेव्हा नवीन लाटेची चाहूल होऊ लागते. त्यामुळे येणाऱ्या तीन ते चार दिवसात हे निर्बंध आम्ही लावण्याचा निर्णय घेऊ
नागपुरात आज Positive आलेल्या 13 पैकी 12 जणांचे लसीकरण झालेले होते, अशी देखील माहिती यावेळी देण्यात आली.