नागपूर : महापौरांना जादा आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार मिळावेत, अशी मागणी नागपूरमध्ये पार पडलेल्या १८ व्या महाराष्ट्र महापौर परिषदेत करण्यात आली. आयुक्तांच्या हाती सगळी सत्ता नको, महापौरांनाही अधिकार मिळावेत, अशी आग्रही मागणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावेळी केली.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आले. महापौरांचे अधिकार वाढवण्याबाबत गांभीर्यानं विचार करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तर अधिकारांचा योग्य वापर केला नाही तर जेलमध्ये जावं लागेल, असा इशारा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केला.