OBC Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगेंच्या मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या. त्यासंदर्भाती निर्णयाची प्रत मराठा समाजाला देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजदेखील आक्रमक झाला आहे. 20 फेब्रुवारीला संभाजीनगर येथे विराट ओबीसी सभा घेण्याची घोषणा कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आज सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. शिंदे समिती शिफारस प्राप्त नाही. कॅबिनेट समोर न जाता, जीआर काढला असे ओबीसी नेत्यांनी म्हटले. सत्ताधारी कुरघोडी करत श्रेयवादाची लढाई करत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण करण्यासाठी ओबीसी समाजला पायादळी तुडवल्याचे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे शासन सांगत होते पण तुम्ही ओबीसी समाजाला फेकून दिले, असा आरोप वडेट्टीवारांनी सरकारवर केलाय. संविधानिक बाबी नसतील त्यांना ओबीसी विरोध करणार आहे. 5 फेब्रुवारीपासून ओबीसी नेते आणि समाज बहुजनांच्या स्फूर्तिस्थळी जाणार असल्याचे ते म्हणाले. चैत्य भूमी येथून सुरूवात करणार असून पोहरादेवी, चौंडी, शाहू महाराज समाधिस्थळ यासह वेगवेगळ्या ठिकाणच्या स्मृतीस्थळावर हजारो गाड्या आणि कार्यकर्त्यांसह जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच 20 फेब्रुवारीला संभाजीनगर येथे विराट सभा घेणार असल्याचे ते म्हणाले.
भुजबळांनी मांडलेली भूमिकेस पाठींबा असल्याचे विजय वड्डेटीवार यावेळी म्हणाले. भुजबळ आणि मी पक्ष मिहणून वेगळे पण ओबीसी म्हणून एक आहोत असे ते म्हणाले. ओबीसी मु्ददावरून भुजबळ यांनी नव्हे तर मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हरिभाऊ राठोड यांची भुजबळांविषयीच्या भूमिकेशी तुर्तास आम्ही सहमत नाही. आम्ही सगळे ओबीसी एकत्र यावे ही आमची भूमिका असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.