मुंबई : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला तरी कोरोना संसर्ग होण्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. या पार्श्वभुमीवर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
यावेळी माजी मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाल शेट्टी, खा. मनोज कोटक, योगेश सागर यांचा समावेश होता.
प्रामुख्याने रेशन धान्य, आरोग्य सुविधांची तातडीने उपलब्धता, पीपीई किटची गरज, तब्लिकी संशयितांवर कारवाई या मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. अन्य एका निवेदनातून जितेंद्र आव्हाड यांना तरुणाला मारहाण प्रकरणी मंत्री पदावरून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. यावरु भाजपाचे नेते आक्रमक झाले असून आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आव्हाड यांची तक्रार केली आहे. असे असताना पोलिसांनी सध्या सोमय्या यांना होम अरेस्ट करण्यात आले होते.
दरम्यान मारहाण झालेल्या तरुणाची भेट घेण्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रयत्न केला.
पण पोलिसांनी त्यांना मुलुंड टोल नाक्यावर अडवले. जिल्हा बंदी असल्याचं कारण देत पोलिसांनी दोन्ही नेत्यांना रोखलं.